दौंड: महान्युज लाईव्ह
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व दौंड कृषी विभागाच्या वतीने कृषी संजीवनी मोहीम सप्ताहास आजपासून दौंड तालुक्यातील कुसेगाव येथुन सुरुवात करण्यात आली. ही माहिती दौंड तालुका कृषी अधिकारी राहुल माने दिली. राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना तसेच पीक सल्लाविषयक माहिती शेतकऱ्यांच्या बांधावर नेण्यासाठी राज्यभर हा कार्यक्रम राबविला जात आहे.त्यानुसार दौंड तालुक्यात या सप्ताहाची कुसेगाव येथुन शनिवारी ( दि.२५ ) सुरुवात करण्यात आली.
यावेळी शेतकऱ्यांना विविध तांत्रिक व आधुनिक शेती बाबत जनजागृती व मार्गदर्शन करण्यात आले. या सप्ताहाअंतर्गत प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या विषयांवर तंत्रज्ञानाचा जागर करण्यासाठी हा कार्यक्रम शेतकऱ्यांच्या बांधावर राबविला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी सहाय्यक मोनिका दिवेकर यांनी करून मोहिमे विषयी माहिती दिली. तर कृषी पर्यवेक्षक पोपट चिपाडे यांनी विविध पिकांचा तंत्रज्ञान प्रसार, बिज प्रकिया, वाण निवड बीबीएफ, कीड व रोग नियंत्रण याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी उपसरपंच अमोल शितोळे, शेतकरी मोहन शितोळे, विजय शितोळे, सागर शितोळे, गणेश शितोळे आदींसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.