सामाजिक

वारीच्या वाटेवर जेव्हा टाळ आणि चाळ एकत्र येतात…!

राजेंद्र झेंडे
दौंड : महान्युज लाईव्ह

माझे जिवीची आवडी.. पंढरपुरा नेईन गुढी.. भक्तिरसात चिंब होऊन पंढरीची आस धरून चाललेल्या वारकऱ्यांना आज टाळ आणि चाळ एकत्र आले पाहायला मिळाले..

संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात गेल्या तीस वर्षापासून न्यू अंबिका कला केंद्र चौफुला या कला केंद्राच्या वतीने टाळ आणि चाळाची अनोख्या संगमाची परंपरा सुरू आहे. दोन वर्षाच्या कोरोनाच्या खंडानंतर त्यातील उत्साहात तसूभरही फरक पडला नव्हता.

दौंड तालुक्यातील वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्राच्या आवारात आज सकाळपासून वारकऱ्यांच्या पंगती उठल्या. शेकडो वारकरी भक्ती भावाने आतमध्ये येऊन जेवण करून जाताना दिसले. अर्थात ही वारकरी सेवेची पहिल्या वर्षाची परंपरा नाही, गेल्या तीस वर्षापासून या केंद्राचे संचालक डॉ. अशोक जाधव व जयश्री जाधव आणि तेथील सर्व महिला सहकारी यांच्या माध्यमातून ही भोजन सेवा अखंडितपणे सुरू आहे.

केवळ भोजन सेवाच नव्हे तर वारकऱ्यांचे मनोरंजन करण्याची ही प्रक्रिया येथील व्यासपीठावरही पार पडली. हातात पताका धरून नाचणाऱ्या नर्तिकांनी भक्ती गीतांवर नृत्य सादर करून वारकरी सेवा केली.

गेली दोन वर्ष या अंबिका कला केंद्रातील 200 जणांच्या कुटुंबाला कोरोना च्या काळात खूप त्रास झाला असे डॉक्टर अशोक जाधव यांनी सांगितले. मात्र या कालखंडानंतर जेव्हा तुकोबा माऊलींची पालखी आपल्या गावात येते आहे, तेव्हा आमच्या मनाला उधाण आले आणि नेहमीप्रमाणेच आमची दरवर्षीची सेवा अखंडित ठेवण्याची परंपरा आम्ही कायम राखली.
न्यू अंबिका कला केंद्राच्या व्यासपीठावर सर्व नर्तिकांनी वारकऱ्यांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. दोन वर्षानंतर माझ्या गावात माझी माऊली येथे आहे आणि तिची सेवा करण्याचा संधी मला मिळते आहे हेच माझ्यासाठी खूप भाग्य आहे असे या नर्तिकांनी सांगितले.

जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी मंडळी शनिवारी यवतचा मुक्काम आटोपून रविवारी वरवंड मुक्कामी जात असताना पालखी मार्गवर असणाऱ्या वाखारी (ता.दौंड) चौफुला येथील न्यू अंबिका कला केंद्रातील महिला लावणी कलावंतांनी वारकऱ्यांची जेवणाची व लावणी बारी पाहण्याची सोय केली होती.
यावेळी सुमारे आठ हजाराहुन अधिक वारकऱ्यांना भोजनाची सोय देखील या कला केंद्राच्या वतीने करण्यात आली.

tdadmin

Recent Posts

मोदीसाहेब, तुमचा टेलीप्रॉम्टर तपासा… खरंच सांगा शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला?

बारामती : महान्यूज लाईव्ह गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक सभा वाढवल्या. या…

1 day ago

पेशव्यांचे सावकार, बारामतीचे विकासपुरुष – बाबुजी नाईक

उन्हाळ्याच्या बोधकथा - २ घनश्याम केळकर : महान्यूज लाईव्ह बारामतीतील सिद्धेश्वर मंदिर तसेच काशीविश्वेश्वर मंदीर…

3 days ago