दौंड : महान्युज लाईव्ह
महाराष्ट्रासह, परराज्यात दरोडे टाकून मोबाईल चोरी करणारी आंतरराज्यीय सराईत टोळी दौंड पोलीसांनी जेरंबद केली आहे. या टोळीकडून १४ लाखांचे १०१ मोबाईल जप्त केले असून ६ जणांवर गुन्हा दाखल केले आहेत. ही माहिती दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस व पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोमरा नगर मोदी (वय २६ रा. आमदा, जि. सरेकला पश्चिम राज्य झारखंड),आकाश दिलीप मोदी (वय २५ वर्षे रा. आमदा, जि. सरेकला पश्चिम राज्य झारखंड), नंदन नगर मोदी (वय २२ वर्ष रा. आमदा, जि. सरेकला पश्चिम राज्य झारखंड) याप्रकरणी या तिघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे तर या टोळीतील तीनजण फरार आहेत.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी, दौंड येथील सरपंच वस्ती परिसरातील सुनिल गणपत जानक यांच्या घरी चाकुचा धाक दाखवुन जबरी चोरी करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न या टोळीने केला. २४ जून रोजी दौंड पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार सहाय्यक फौजदार महेंद्र गायकवाड यांना दौंड शहरातील अमर सोसायटी येथून मोबाईल चोरून नेलेबाबतची माहीती मिळाली. पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना तात्काळ गुन्हे अन्वेषण पथकासह माहिती मिळालेल्या ठिकाणी गेले. तीन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले त्यांच्या टोळीमध्ये आणखी ३ व्यक्ती असल्याची माहिती तपासात समोर आली.
या टोळीने विवो, ओप्पो, सॅमसंग, रेडमी, एम. आय. रिअल मी, पॅनासॉनिक, पोको, टेक्नो, होनर, अॅसुस, लिनीओ, जिओ, वन प्लस, आय फोन, नाझरा अशा विविध कंपनीचे मोबाईल इटारशी, अमरावती, नागपुर, जळगाव, भुसावळ, नाशिक या जिल्ह्यातुन चोरी केले आहेत. तसेच दरवर्षी महाराष्ट्रात पालखीमध्ये सामील होवुन मोबाईल चोरी करून ते झारखंड येथे घेऊन जावुन विक्री करीत असल्याचे पोलीस तपासात समोर आले.
१४ लाखाचे एकूण १०१ मोबाईल त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले असुन ६ जणांवर दौंड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीमध्ये आणखी कोणा कोणाचा सहभाग आहे आणि त्यांनी अशा प्रकारचे आणखी किती ठिकाणी चोरी केली आहे याबाबत सखोल तपास पोलीस करीत आहेत.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी,राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, पोलीस उपनिरीक्षक सतिश राऊत, सहाय्यक पोलीस फौजदार डि.जी. भाकरे, महेंद्र गायकवाड, संभाजी साळुंखे, पोलीस हवालदार पांडुरंग धोरात,सुभाष राऊत, पोलीस नाईक अमोल गवळी, अमीर शेख, शरद वारे, आदेश राऊत, विशाल जावळे, पोलीस शिपाई अमोल देवकाते, अमजद शेख, योगेश गोलांडे, अभिजित गिरमे, रवींद्र काळे, किशोर वाघ, रेल्वे पोलीस प्रदीप गोयकर (रेल्वे पोलीस) वाहतूक पोलीस नाना उबाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.