मुंबई : महान्यूज लाईव्ह
स्कायट्रॅक्सने जगातील सर्वोत्तम ५०० विमानतळाची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यातील सर्वोत्कृष्ट १०० विमानतळांमध्ये भारतातील चार विमानतळांचा समावेश आहे. या चार विमानतळांमध्ये मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ यांचा समावेश आहे.
भारतातही विमानतळांच्या विद्यमान पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. याचाच परिणाम म्हणून या चार विमानतळांचा समावेश या यादीत झालेला आहे.
दिल्ली विमानतळ हे भारतातील सर्वोत्कृष्ट विमानतळ असून या यादीत ते ३७ व्या क्रमांकावर आहे. बेंगळुरू विमानतळ ६१ व्या, हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ ६३ व्या, तर मुंबई विमानतळ ६५ व्या क्रमांकावर आहे. १६ जून रोजी पॅरीस येथील एका कार्यक्रमात ही यादी जाहीर करण्यात आली. या य