किशोर भोईटे
सणसर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील तसेच श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन उद्या भवानीनगर येथे करण्यात आले आहे. इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने होणाऱ्या या कार्यक्रमासाठी खासदार सुप्रिया सुळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम छत्रपती मंगल कार्यालय, भवानीनगर येथे सकाळी साडेआठ वाजता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, मंगल सिद्धी दूध संघाचे चेअरमन राजेंद्र तांबिले, जिल्हा परिषदेचे माझी बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, सदस्य हनुमंतराव बंडगर, छत्रपती कारखान्याचे संचालक ॲड. रणजीत निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे पाटील यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.