किशोर भोईटे
सणसर : महान्यूज लाईव्ह
विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना व नवकल्पनांना वाव देण्यासाठी विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल बिल्ट, भिगवण येथे इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विज्ञान प्रतिकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले.प्रदर्शनाचे उद्घाटन शिव फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संपत बंडगर यांनी केले. विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद देत विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ‘आपले पर्यावरण’ या संकल्पनेशी संबंधित जलचक्र, शरीर संरचना, ‘पाणी वाचवा,वसुंधरा वाचवा’, वाहतूक व्यवस्था,प्रदूषण इत्यादी विविध प्रतिकृती तयार केल्या होत्या.
अध्यक्ष संपत बंडगर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरिता शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना नवनवीन संकल्पना मांडण्यास प्रोत्साहित केले. पालकांनी भरघोस प्रतिसाद देत विज्ञान प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.
योग दिन साजरा
‘योगा फॉर ह्युमॅनिटी ‘ या थीम अंतर्गत विद्या प्रतिष्ठान स्कूल, भिगवण येथे योगदिन उत्साहात साजरा करन्यात आला.आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित , योगाच्या उपयुक्ततेचा संदेश देण्यासाठी विद्या प्रतिष्ठान स्कूल बिल्ट , भिगवण येथे २१ जून रोजी योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात भिगवण येथील डॉ. पद्मा खरड यांनी योगसाधना, योगाचे महत्व , आसन करण्याची योग्य पद्धत याविषयी माहिती देऊन प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थीदशेमध्ये शरीर निरोगी व मन शांत राहणे किती आवश्यक आहे आणि यासाठी योगसाधना कशी उपयुक्त आहे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांनी विविध आसनांची प्रात्यक्षिके करून उत्स्फुर्तपणे आपला सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या श्रीमती सरिता शिंदे यांचे मार्गदर्शन तसेच नवनाथ इंगळे व इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.