मु्ंबई : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे राजकीय बंड सध्या फुल फॉर्ममध्ये आहे. या बंडातील सगळे आमदार त्यांचे सध्याचे नेते एकनाथ शिंदेसोबत प्रथम सूरतला आणि आता तेथून गुवाहाटीला गेले आहे. दोन्हीकडे ते मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिलेले आहेत. या हॉटेलमधील एका रुमचे भाडे ऐकूनही सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यावर अंधारी येईल अशा या हॉटेलमध्ये ७० रुम त्यांनी बुक केल्या आहेत. आता सर्वसामान्य माणसाचा प्रश्न असा आहे की, त्यांचा तिथला राहण्याचा खर्च करतय तरी कोण?
महाराष्ट्रापासून २००० किमी अंतरावर असलेल्या आसाममधील गुवाहाटीतील रेडीसन्स ब्यू हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या आमदारांनी मुक्काम ठोकला आहे. या हॉटेलमधील ७० रुम त्यांच्या ताब्यात आहेत. त्यांचे दररोजचे भाडे ५६ लाख रुपये आहे. या आमदारांचा जेवण व इतर खर्च जर विचारात घेतला या सर्वांचा मिळून दररोजचा खर्च ८ लाख रुपये आहे. हे आमदार सध्यातरी ७ दिवसासाठी येथे राहणार आहेत, म्हणजेच त्यांचा एकुण खर्च ५६ लाख रुपये होणार आहे.
हे ऐवढे पैसे खर्च कोण करते आहे, हा सर्वसामान्यांचा खरा प्रश्न आहे. अशा बड्या बड्या हॉटेलच्या दारातून जायलाही सर्वसामान्य माणुस बिचकतो, अशा या हॉटेलमध्ये इतके दिवस राहणे या सर्वसामान्यांच्या प्रतिनिधींना कसे परवडते.
दुसरा प्रश्न असा की केंद्रीय तपास यंत्रणा या खर्चाचा हिशोब कशी मागतील का ?
जनतेच्या पैसा आहे सगळा लुबाडलेला
त्यांचे दररोजचे भाडे 56 लाख रुपये…
दररोजचा खर्च आठ लाख रुपये…
म्हणजे म्हणजे दररोज ६४ लाख रुपये खर्च…
सात दिवस राहणार म्हणजे…
७ X ६४=४४८ लाख