मुंबई : महान्यूज लाईव्ह
परदेशी गेलेल्या लोकांना अनेकदा विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते. आता बॉलिऊड कलाकार अन्नू कपूरही अशाच अनुभवाला सामोरे जात आहे. अन्नू कपूर यांना तर फान्समधील फ्रेंच चोरट्यांनी चांगलाच हात दाखवला आहे. स्वत: अन्नू कपूर यांनी आपला हा अनुभव सोशल मिडियावर शेअर केला आहे.
पॅरीसमध्ये अन्नू कपूर यांची एक बॅग चोरीला गेली. काही लोक त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने आले आणि त्यांची ही बॅग चोरुन घेऊन गेले. या बॅगमध्ये त्यांचे बरच महत्वाचे सामान होते. या घटनेनंतर तेथील स्थानिक लोक त्यांच्या मदतीलाही आले. पण गेलेली बॅग काही अद्याप त्यांना परत मिळालेली नाही. या बॅगमध्ये स्वीस कॅश होती तसेच युरो आणि फ्रेंच चलनही होते. त्यात आयपॅड होते, डायरी होती आणि क्रेडीट कार्डही होते. हे सगळे लंपास झाले. यातही सुदैवाची गोष्ट म्हणजे त्यांचा पासपोर्ट. तो मात्र त्यांच्याकडे सुरक्षित आहे.
अन्नू कपूर यांनी फ्रान्समध्ये येणाऱ्या पर्यंटकांनाही याबाबतीत सावध केले आहे. येथे खिसेकापू फिरत असतात, त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे. अन्नू कपूर हे आता पोलिसांत तक्रार करणार आहेत. फान्समधील रेल्वे कर्मचाऱ्यांनीही त्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे.
पण आता त्यांच्याकडे ना रोख रक्कम उरली आहे, ना क्रेडीटकार्ड. ते तर फ्रान्स फिरण्याचा प्लॅन करून आले होते पण आता फ्रान्सने त्यांना चांगलेच लुटले आहे, असे ते व्हिडिओत म्हणताना दिसत आहे. यानंतरच्या एका व्हिडिओत त्यांनी फ्रेंच आणि भारतीय रेल्वेची तुलना केली आहे. फ्रेंच रेल्वेत सामान ठेवण्यासाठी अजिबात जागा नसते. त्या तुलनेत भारतीय रेल्वे खुप चांगली असल्याचे ते म्हणताता दिसतात. फ्रेंच माणसांबाबतही त्यांचा अनुभव खुपच वाईट असल्याचे ते म्हणताना दिसतात. आपल्या इंस्टाग्राम पोस्टवर त्यांनी फ्रान्सचे अधिकारी, मंत्री आणि भारतीय दुतावास यांना टॅग केले आहे. अजुनही त्यांना चांगल्या बातमीची प्रतिक्षा आहे.