शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर तालुक्यातील महत्त्वाची सहकारी संस्था असलेल्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून ३१ जुलै रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रपंचाशी निगडित असलेला साखर कारखाना म्हणून घोडगंगा सहकारी साखर कारखाना ओळखला जातो.या कारखान्यासाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार असून २४ जुन ते ३० जून पर्यंत अर्ज दाखल केले जाणार असून दाखल केलेल्या अर्जाची छाननी १ जुलै रोजी पार पडणार आहे. उमेदवारांना अर्ज माघार घेण्याची मुदत १८ जुलै पर्यंत राहणार असून ३१ जुलै रोजी मतदान होणार आहे.तसेच मतमोजणी १ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे.
शिरूर तालुक्यातील महत्त्वाची सहकारी संस्था असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे. या कारखान्यावर आमदार अशोक पवार यांची सत्ता असली तरी यावेळी प्रथमच सर्वपक्ष एकत्र येत किसान क्रांती पॅनल उभा राहिला आहे.त्यामुळेही या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.