बारामती : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्ह्यातील बारामती येथे सायन्स अँड इंनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटर येथे झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात, महाड सेंट झेवियर्स हायस्कूलच्या इयत्ता १० वी मधील विद्यार्थिनी कु. अस्मिता ज्ञानेश्वर चौगुले हिला ‘वेस्ट मॅनेजमेंट प्रोजेक्ट’ च्या प्रयोगाला उत्तेजनार्थ क्रमांक मिळालेला असून, पद्म विभूषण, अनुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या हस्ते अस्मिता चौगुले यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
बारामती येथे राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन व महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्ट यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या सायन्स सेंटरचे लोकार्पण माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी उद्योगपती गौतम अदानी, अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, केवीके चे प्रमुख राजेंद्र पवार व मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी अस्मिता चौगुले यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी अस्मिता चौगुले हिने कचरा व्यवस्थापन सयंत्राचा प्रयोग सादर केला. आपल्या घरातील दररोज निघणार ओला कचरा सयंत्रामध्ये टाकून, त्याचे रूपांतर सेंद्रिय खातात होत असून, सयंत्राच्या खालील बाजूस असलेली जाळी त्यामधून निघणारे पाणी हे देखील आपल्या पारस बागेतील झाडांना आपण सेंद्रिय खत म्हणून वापर करू शकतो. या यंत्राचे खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून कौतुक करण्यात आले. तसेच सर्व स्तरातून अस्मिताचे कौतुक होत आहे.
अस्मिता चौगुले हिने विज्ञान प्रदर्शनात मिळविलेल्या प्राविण्याबद्दल महाड सेंट झेवियर्स हायस्कूलचे चेअरमन जॉन्सन डिसुजा, प्रिन्सिपल ईसाबेला डिसुजा, प्रथम शिक्षिका जुली डिसुजा, सिमा हेलेकर, विकास सिंग, अस्मिता हटकर, प्रिया शहा, घनश्याम खैरनार, चेतन सुतार, शैलजा अर्जुगडे, मिनल निकम, अस्मिता मोरे, मृगया उपाध्ये, ज्योती कुंदतील तसेच मच्छिंद्र चौगुले, ज्ञानेश्वर चौगुले, सचिन चौगुले, रवींद्र चौगुले यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.