दौंड: महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील राजेगाव – नायगाव हद्दीतील उजनी व वन संपादित भीमा नदीच्या पायथ्याला असलेल्या क्षेत्रातून जेसीबी मशीन च्या सहाय्याने बेकायदा उत्खनन करून मातीची अहोरात्र वाहतूक करुन चोरी केली जात आहे. मात्र संबंधित प्रशासन याकडे साफ डोळेझाक करीत आहे.हा बेकायदा माती उत्खनन आणि वाहतूक त्वरित बंद करून संबंधित माती चोरांवर कायदेशीर कारवाई करावी.तसे न झाल्यास दौंड भिगवण रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे.
भीमा नदीची पाणी पातळी जशी घटली आहे.तशी या भागातून मातीची चोरी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.समंधीत क्षेत्र उजनी व वन संपादित असल्याने या क्षेत्रात भीमा सिंचन शाखेच्या अंतर्गत व वन विभाग अंतर्गत येत आहे . मात्र येथील कर्मचारी या क्षेत्राची कसलीच देखभाल करत नाहीत. येथील उत्खनन केलेल्या क्षेत्राचे पंचनामे करून कारवाई करण्याची मागणी नागरिक मागील अनेक दिवसांपासून करत आहेत. मात्र संबंधित अधिका-यांच्या आर्थिक तडजोडीमुळे अहोरात्र जेसीबी मशीनच्या सहाय्याने उत्खनन करून ट्रॅक्टरने वाहतूक केली जात आहे. वीटभट्टी व शेती भरण्यासाठी या मातीची चोरी केली जात आहे. या माती उत्खनामुळे नदी पात्रात मोठं मोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात नदी पात्रात पाणी मोठ्या प्रमाणात आल्यास नदीचे पात्र बद्ण्याची शक्यता नागरीकांनी व्यक्त केली आहे. शासकीय मालमत्तेचे नुकसान होत असून प्रशासनांचा लाखो रुपयांचा महसूल बुढवला जात आहे .शासकीय संपत्तीचे नुकसान करणाऱ्या या माती तस्करावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहे.
या पाच दिवसाच्या आत माती उत्खनन व वाहतूक बंद झाली नाही तर दौंड – भिगवण रस्ता रोखो आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थ मुकेश गुणवरे,मनोज भोसले,भारत खराडे,अमोल मोरे,दत्ताजी मोघे,महादेव बागडे,नवनाथ लोंढे,शहाजी गुणवरे,सचिन खैरे,सचिन मोरे आदींनी प्रशासनाला निवेदनावर दिला आहे.