सामाजिक

महाराष्ट जाऊ द्या, मुंबई तरी वाचवा! वर्षा ते मातोश्री ‘ रोड शो ‘! ठाकरेंचे धोरण काय?

महाराष्ट्रात सत्ताबदल होणार हे आता स्पष्ट झाले आहे. आता ही बाजी पलटवणे हे महाविकास आघाडीला शक्य होणार नाही हेदेखील आता मुख्यमंत्र्यांना कळून चुकले दिसते आहे. त्यामुळेच काल रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला वर्षा बंगला सोडून आता मातोश्रीवर आपला मुक्काम हलवला आहे. मातोश्रीवर येत असताना त्यांनी केलेला ‘ रोड शो ‘ पाहता महाराष्ट्र हातातून निसटत असला तरी किमान मुंबई तरी आपल्या हाती टिकवावी यासाठी केलेला प्रयत्न असावा असे मानले जाते आहे.

मात्र कोरोना झाला असतानाही गर्दीत जाऊन लोकांना भेटण्यामुळे त्यांच्यावर कोरोना नियमांचा भंग केल्याची तकार मात्र दाखल झाली आहे.

दरम्यान शिवसेनेचे आणखी तीन आमदार गुवाहाटीत दाखल झाल्याची चर्चा आहे. पक्षांतर बंदी कायद्यानुसार शिंदे गटाकडे ३७ आमदारांचे बळ असेल तर त्यांना पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत होणारी कारवाई टाळता येईल. मात्र एकनाथ शिंदेकडे सतत आमदारांचा बळ वाढत चालले आहे. त्यामुळे त्यांना हा आकडा पार करणे फारसे अवघड जाईल असे वाटत नाही. त्यामुळे आता महाराष्ट्रातील सत्ता गेली तरी किमान मुंबईतील सत्ता तरी टिकवावी असे धोरण ठाकरे यांनी ठरविल्याचे दिसते आहे. शिवसेनेचा सगळा जीव मुंबईमध्ये आहेत, आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकाही तोंडावर आहेत. गेल्या निवडणूकांवेळीच भाजपाने मुंबई महानगरपालिकेत मोठी मुसंडी मारलेली आहे. आता जर त्यांना शिंदे गटाची मदत मिळाली तर मुंबई टिकवणे हे उद्धव ठाकरेंना फारच अवघड होणार आहे. त्यामुळेच आता खरी लढाई ही मुंबई महानगरपालिकेसाठीच होणार असे दिसते आहे.

tdadmin

Recent Posts

इंदापूरमध्ये घड्याळाचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत? पैशावरून राडा!

इंदापूर : महान्यूज लाईव्ह  महायुतीचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत, म्हणून महिलांनी इंदापूरात…

9 hours ago

मोदीसाहेब, तुमचा टेलीप्रॉम्टर तपासा… खरंच सांगा शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला?

बारामती : महान्यूज लाईव्ह गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक सभा वाढवल्या. या…

2 days ago