मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज साधलेले मनोगत.. त्यांच्याच शब्दात..!
माझी कोविड टेस्ट पाॅझिटीव्ह. बोलण्यासराख बरेच. कोविड काळात लढाई लढलो. कठिण काळात कोणीही तोंड दिले नाहि अश्या परिस्थितीत मला.जे कराचे ते प्रश्न प्रमाणिक पणे केले. तेव्हा देशातील पहिल्या पाच मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून होया.
माध्यमात अनेक अफवा सुरू आहेत. मी भेटूत नव्हतो हे काही दिवस शक्य नव्हते. कारण शस्त्रक्रिया. आता सुरुवात केली. पहिली कॅबिनेट रूग्णालयात घेतली. शिवसेना हिंदुत्वापासून दूर होऊ शकत नाही म्हणूनच आदित्य व एकनाथ शिंदे अयोध्येला गेले. हिंदुत्वावर बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे हे वेगळे सांगायला नको.
ही बाळासाहेबांची शिवसेना नाही अशी बातमी पसरविण्यात आली. पण सन २०१४ मध्ये एकट्याच्या ताकदीवर ६३ आमदार शिवसेनेचे आमदार निवडून आले, ती पण हिंदुत्वावर. शिवसेना कुणाची? बाळासाहेबांची! पण मधल्या काळात जे मिळाले ते याच शिवसेनेने मिळवले.
सध्या आमदार गायब झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. काही आमदारांचे फोन येत आहेत. कोणी आम्हाला पळवून नेलेले असे सांगते, कोणी आम्हाला फसवून नेल्याचे सांगतात. काल परवा निवडणुक झाली. हाॅटेल मध्ये गेलो तेव्हा बोललो, की ही कुठली लोकशाही? शंका ठिक पण लघुशंकेला गेला तरी शंका? मी इच्छेपेक्षा जिद्दीने काम पूर्ण करणारा आहे. कुठलाही अनुभव नव्हता. नाईलाजाने वेगळा मार्ग घ्यावा लागला. विशेषतः पवार साहेबांनी सांगितले, जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे. पवारांचा, सोनियाजींचा आग्रह म्हणून जिद्द केली. नुसता स्वार्थ नव्हता. वळणदार राजकारण कुणाचेच उपयोगाचे नाही. प्रशासनाने मला खूप मदत केली.
धक्का हो धक्का. सत्तेसाठी एकत्र आलो. सकाळी कमलनाथ, पवारांचा फोन आला. माझ्यावर विश्वास आहे असे सांगितले. पण, माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल, तर मग काय करायचे? मी त्यांना आपले मानतो, त्यांचे माहिती नाही. तुम्ही पळता कशाला? त्यांच्यापैकी कुणीही सांगितले की, मी मुख्यमंत्री नको, तर मी सोडायला तयार. आज मी वर्षावर मुक्काम हलवतोय. पण हे समोर येऊन बोला.
मुख्यमंत्र्यांनी सांगितली कुऱ्हाडीची गोष्ट.
ज्याने घाव घातल्या जाताहेत, त्याच्या वेदना अधिक असतात. शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करु नका. मला कोविड झालाय, मी राजीनामा देतो तुम्ही येऊन घेऊन जा. हे काय मोठे आव्हान आहे. शिवसैनिक सोबत आहे, तोवर मी कुठल्याही आव्हानाला समोर जाईन. शिवसैनिकांना असे वाटत असेल, तर मी पक्षप्रमुख पद सोडायला तयार आहे. संकाटाला सामोरा जाणारा शिवसैनिक आहे. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर माझी तयारी आहे.
एकदा ठरवू या. समोर या. सांगा आम्हाला संकोच वाटतोय हे स्पष्ट सांगा. मी पद सोडायला तयार आहे. आयुष्याची कमाई म्हणजे ही पदे नाहीत. फक्त याच माध्यमातून मी तुमच्याशी बोललो. कुटुंब प्रमुख म्हणून मला अनेकांनी सांगितले. ही माझी कमाई. माझे हे नाटक नाही. माझ्यासाठी सत्ता हा विषय गौण आहे. मी तुम्हाला आपला मानतो. त्यांनी मला सांगाव, मी मुख्यमंत्री पद सोडतो. एकच सांगतो, तुमचे प्रेम असेच ठेवा.