दौंड: महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील रोटी हद्दीतील शेतकरी तानाजी केकाण यांच्या मालकीच्या शेत जमिनीमधून पाटस येथील दोन मुरूम माफिया मशीनच्या साहाय्याने व ट्रॅक्टर हायवा या वाहनातून माती व मुरूम उपसा खुलेआम वाहतूक करुन दिवस-रात्र चोरी करीत आहे. अशी तक्रार शेतकरी तानाजी केकाण यांनी गाव कामगार तलाठी व पाटस मंडल अधिकारी यांच्याकडे केली आहे. रोटी घाटा पासून काही अंतरावर असलेल्या पाटस येथील शेतकरी तानाजी केकाण यांच्या शेत जमीन ( गट क्रमांक २७ ) मधून बेकायदा मशिनच्या साह्याने उत्खनन करून माती व मुरूम दिवसा व रात्रीच्या सुमारास चोरी करीत आहेत. मागील अनेक दिवसांपासून हे जमिनीतून या मातीची छोट्या पद्धतीने उत्खनन करून व रोटी ते पाटस परिसरात वाहतूक करीत आहे पाटस तोडणी करून घ्यायची वाहतूक होत आहे. तानाजी केकान हे आज आपल्या शेतजमिनीत फेरफटका मारण्यासाठी गेले असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ रोटी येथील गावकामगार तलाठी व पाटस येथील मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आप्पा दसरथ तोंडे व संजय गोफणे हे जमिनीतून माती व मुरमाची चोरी करीत असल्याची तक्रार केली आहे.
त्याबाबत गावकामगार तलाठी रोहन गबाले यांच्याशी संपर्क साधला असता सदर शेतजमिनीत जाऊन प्रत्यक्षात पाहणी करून पंचनामा करण्यात येईल असे सांगितले. तर तहसीलदार संजय पाटील यांनी याबाबत दखल घेऊन संबंधित मातीत चोरांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी शेतकरी तानाजी केकाण यांनी केली आहे.