मुंबई : महान्यूज लाईव्ह
राज्यातील राजकीय बंडाळीच्या साथीने अगोदरच कोमात घालवलेल्या शिवसेनेला पुन्हा एक धक्का बसला असून, राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील कोरोना ची लागण झाली आहे.
राज्यपाल कोशियारी यांना आज सकाळी कोरोना ची लागण झाल्याचे समोर आले. त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे, तर त्याच वेळी त्यांचा राज्यपाल पदाचा कार्यभार गोव्याच्या राज्यपालांकडे सुपूर्त करण्यात आला आहे. त्यावरून अगोदरच राज्यात वेगळी चर्चा सुरू असतानाच, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील कोरोना ची लागण झाल्याचे समोर आले आहे.
मुंबई राजभवनात शिवसेनेचे बंडखोर नेते मंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदाराविषयी दावा करणार होते, मात्र आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना करोनाची लागण झाल्याने त्यांचा पदभार व तात्पुरता कार्यभार गोव्याचे राज्यपाल श्री पिल्लई यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
त्यामुळे हा दावा आता महाराष्ट्राबाहेर करावा लागणार असल्याचे चित्र आज सकाळपासून सुरू असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील कोरोना ची लागण झाल्याचे समोर आले आहे. या दोघा प्रमुख कारभाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्याच्याविषयी उलट-सुलट चर्चा राज्यभरात आता सुरू झाल्या आहेत.