• Contact us
  • About us
Thursday, November 30, 2023
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लाखो वारक-यांच्या उपस्थितीत श्रींच्या पादुका पालखीची ग्रामप्रदक्षिणा.! दोन दिवसांच्या मुक्कामासाठी श्रींच्या पालखीचे पुण्याकडे प्रस्थान..!

Maha News Live by Maha News Live
June 22, 2022
in यशोगाथा, संपादकीय, सामाजिक, सुरक्षा, आरोग्य, आर्थिक, कथा, राष्ट्रीय, राज्य, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, प्रवास, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह

इंदापूर : वारकरी संप्रदायाचे प्रतीक असलेली गळ्यात तुळशीमाळ, हातात भगव्या पताका मुखाने हरिनामाचा गजर करीत यावर्षी कोरोना महामारीच्या संकटाचे सावट फारसे नसल्याने लाखो भावीकांचे उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात माउलींच्या पालखीचे प्रस्थान भक्ती मार्गाचे दैवत श्री विठ्ठल भगवान पांडुरंगाचे दर्शन आणि वारीला जाण्यास माउली मंदिरातील विना मंडपातून मंगळवारी (दि.२१ ) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हरिनाम गजरात झाले.

यावर्षी प्रस्थानला लाखो वारकरी भाविकांची गर्दी झाल्याने प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. वारकरी, भाविकांच्या उपस्थितीत श्रींच्या पालखी सोहळ्याने प्रस्थान ठेवले. या प्रसंगी शिवसेनेचे खासदार बंडु जाधव,आमदार दिलीप मोहिते, रोहित पवार, श्रीकांत भारती, माजी मंत्री बाळा भेगडे,जिल्हाधिकारी डॉ्.राजेश देशमुख,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, उर्जितसिंह शितोळे सरकार, महादजी शितोळे, पालखी सोहळा प्रमुख अँड विकास ढगे पाटील, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त डॉ. अभय टिळक, आळदी नगरपरिषद प्रशासक तथा खेड तहसीलदार वैशाली वाघमारे, माजी नगराध्यक्षा वैजयंता उमर्गेकर, माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील, खेडचे प्रांत विक्रांत चव्हाण, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, प्रेरणा कट्टे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव, पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, मानकरी बाळासाहेब कु-हाडे, योगेश आरु, अनिल कु-हाडे, मंडलाधिकारी स्मिता जोशी, दिंडी प्रमुख, फडकरी, दिंंडीकरी, मानकरी यांचे उपस्थितीत झाले.

प्रस्थान दिनी श्रींचे पूजेचे पौरोहित्य अमोल गांधी, महेश जोशी, राजाभाऊ थेटे, योगेश चौधरी यांनी केले. प्रस्थान सोहळ्याचे नियोजन यावर्षी थेट शासनाचे हस्तक्षेपात झाले. शासनाने वारीला परवानगी दिली. मात्र गर्दी वाढेल या शक्यतेने पोलीस बंदोबस्त मोठा तैनात करीत स्थानीक नागरिकांना रहदारीला गैरसोय झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

यावर्षी सोहळ्यावर कोरोना या महामारीचे संकट नसल्याने देखील प्रशासनाने पुरेशी दक्षता व काळजी घेत महसूल व पोलीस प्रशासनाने नियोजन करून आळंदी देवस्थान सोहळ्यातील संबंधित घटकांना विश्वासात घेऊन प्रस्थान पार पडले. प्रशासनास आळंदीकर नागरिक व भाविकांनी ही मोठा प्रतिसाद दिल्याने गर्दीवर नियंत्रण मिळविता आले. यासाठी पोलीस प्रशासनाने शहरात चोख बंदोबस्त ठेवला आहे.

अलंकापुरीत प्रस्थान सोहळ्यापूर्वी परंपरांचे पालन करीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात मंदिरात पहाटे काकडा आरती, पवमान अभिषेक झाला. मंदिरात भाविकांना दर्शनास दुपार पर्यंत सोय करण्यात आली होती. श्रींचे संजीवन समाधी दर्शनास भाविकांनी गर्दी केली.

दरम्यान नऊ वाजता वीणा मंडपात परंपरेने कीर्तन सेवा झाली. दुपारी परंपरेने मंदिरात श्रीनां महानैवेद्य झाला. यासाठी प्रथम सेवेकरी व स्वकाम सेवक यांनी स्वच्छता स्वयंसेवक यांचे माध्यमातून सेवा रुजू केली. मंदिर प्राकार व श्रींचा गाभारा स्वच्छ केला. दरम्यान पाऊणे तींचे सुमारास दींड्या मंदिरात येण्यास हरिनाम गजरात सुरुवात झाली.

वारकरी परंपरेच्या संप्रदायीक खेळ, हरिनाम गजराने स्वर टिपेला पोहोचला. मंदिराबाहेर भाविक, वारकरी यांची मोठी गर्दी उसळली. दिंड्या सोडण्यास मात्र यावेळी आत येण्यास उशीर झाला. यावर्षी पालखी पायी वारी सोहळा असल्याने सोहळ्यातील इतर कार्यक्रम हरिनाम गजरात झाले. सोहळ्यास यावर्षी परंपरेने सुरुवात झाली.

दरवर्षी प्रस्थान दिनी दुपारी दोन ते तीनच्या सुमारास श्रींचे रथापुढील आणि रथामागील मानाच्या ४७ दिंड्यांना देऊळवाड्यात सोहळ्यातील परंपरेप्रमाणे चोपदार यांचे सूचनांप्रमाणे महाद्वारातून प्रवेश देण्यास सुरुवात झाली. मात्र आत येण्यास विलंब झाला.

यावर्षी दिंड्या व संबंधित दिंडी प्रमुख, वारकरी घटकांचे स्थानिक प्रतिनिधी यांना देखील प्रवेश देण्यात आला. दरम्यान श्रींचे मंदिरात माउलींच्या समाधीवर ब्रह्मवृंदाच्या वतीने श्रीनां वैभवी पोशाख झाल्या नंतर श्री गुरू हैबतरावबाबांच्या वतीने माउलींच्या समाधीची परंपरेने आरती हरिनाम गजरात झाली.

त्यानंतर माउली संस्थांनचे तर्फे श्रींची आरती करण्यात आली. दरम्यान श्रींचे वैभवी चांदीचे पादुका प्रस्थानासाठी पुष्पसजावटीने सजलेल्या चौथ-या वर वीणा मंडपात ठेवण्यात आल्या. श्रींचे चलपादुकांची विधिवत प्राणप्रतिष्ठापना झाली. या वेळी सोहळ्यातील नियमा प्रमाणे आळंदी संस्थानच्या वतीने मानकऱ्यांना पागोटे वाटप, श्रीगुरू हैबतरावबाबांच्या वतीने दिंडी प्रमुखांना पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र आरफळकर,बाळासाहेब आरफळकर यांचे हस्ते नारळ प्रसाद वाटप झाले.

श्रींचे संजीवन समाधी गाभाऱ्यात आळंदी देवस्थान च्या वतीने परंपरेने मानकरी यांना नारळ प्रसाद देण्यात आला.परंपरेने धार्मिक उपक्रम होताच श्रींचे चलपादुका देवस्थान तर्फे पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र व बाळासाहेब आरफळकर यांचे कडे देण्यात आल्या. मालक आरफळकर यांचे नियंत्रणात श्रींचे पादुका पालखीतून मंदिर प्रदक्षिण हरिनाम गजरात झाली.

श्रींची वैभवी चलपादुका मालकांकडे हरिनाम गजर करीत पालखीत ठेवूंन विधिवत पूजा होताच श्रींची पालखी आळंदीकर ग्रामस्थ यांनी नाम जय घोष करीत खांद्यावर उचलीत माउलींच्या वारीला जाण्यास वीणा मंडपातून सायंकाळी पंढरी कडे प्रस्थान ठेवले. माऊलींचे पादुकां पालखीची हरिनाम गजरात मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर श्रींचे पादुका पालखी सोहळा आजोळघरा लगतच्या जुन्या रामवाड्याचे गांधी वाड्यात दर्शनबारी सभागृहात हरिनाम गजरात आणण्यात आल्या.

येथे सोहळ्यातील परंपरांचे पालन करीत समाज आरतीने श्रींचा सोहळा विसावला. येथे गांधी परिवार तर्फे परंपरेने सोहळ्याचा पाहुणचार होत आहे.आळंदीत यावर्षी पहिला एक मुक्काम होत श्रींची पालखी पुढील दोन दिवसांचे मुक्कामासाठी पुण्याकडे बुधवारी ( दि.२२) मार्गस्थ होईल. यावर्षीची पायी वारी असल्याने लाखो भाविकांची सोहळ्यास उपस्थिती राहिली.

आळंदी देवस्थानने श्रींचे सोहळ्याचे थेट प्रक्षेपण व्यवस्था केल्याने घरी राहून लाखो नागरिकांना सोहळा पाहता आला. यावर्षी श्रींचे पालखीची मंदिर प्रदक्षिणा, ग्राम प्रदक्षिणा हरिनाम जय घोषित झाली. आळंदी मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावट व आकर्षक रंगावली, मंदिरात व इंद्रायणी नदी घाटावर लक्षवेधी विद्युत रोषणाई करण्यात आली. नदी घाटावर देहू आळंदी विकास समितीचे वतीने विविध लोकशिक्षण पार कार्यक्रम झाले. विद्युत रोषणाईने भाविकांची मने जिकली. थेट प्रक्षेपण असल्याने नागरिकांनी घरात राहून पालखी सोहळ्याचा आनंद लुटला.

श्रींचे प्रस्थान दिनी मंदिरात श्रींचे पौरोहित्य करण्यासाठी पहाटे काकडा आरती चार वाजता , पवमान अभिषेख व श्रींची पहाट आरती पूजेसाठी श्रीक्षेत्रोपाध्ये पुजारी वेदमूर्ती प्रसाद जोशी, अमोल गांधी, सौरभ चौधरी यांनी तसेच प्रस्थांची मुख्या पूजे साठी योगेश चौधरी,अमोल गांधी, सौरभ चौधरी, महेश जोशी यांनी परंपरेने पौरोहित्य केले.

श्रींचे नगरखान्याचे मानकरी बाळासाहेब भोसले यांनी श्रींचे पालखी प्रस्थान साठी लक्षवेधी नगारखाना सजविला. श्रीचे पालखी व्यापारी तरुण मंडळ माऊली ग्रुप ने तर पालखी रथ सुदीप गरुड आणि परिवाराने सजविला. यावर्षी रथ ओढण्यासाठी सेवा पांडुरंग वरखडे आणि तान्हाजी वरखडे यांनी रुजू केली आहे. श्रींचे वैभवी पालखी रथाला शोभेल अशी आकर्षक बैलजोडी ने रथाचे तसेच सोहळ्याचे वैभव वाढविले आहे.

यासाठी सोन्या माउली बैलजोडही यावर्षीची रथ सेवा देणार आहे. श्रींचे सोहळ्यात चवरी ढाळण्याची सेवा योगीराज कुऱ्हाडे यांचे कडे तर अबधागिरी सेवा योगेश आरू, माजी नगराध्यक्ष राहुल चीताळकर पाटील, आरतीचे मानकरी अनिल कुऱ्हाडे यांचे कडे आहे. यावर्षीची परंपरेने श्रींचे सोहळ्यात चोपदार बाळासाहेब रणदिवे यांची सेवा रुजू होत आहे. श्रींची कोठी सजावट व जमवाजमव अगदी मिठापासून मिरची, हळद, हिंग, मोहरी, सुई दोरा, रथाचे नियोजनापर्यंत वारी सोहळ्यासाठी आवश्यक साहित्य व्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांनी संकलन केले.

Next Post

पाटस येथील सलोनी जाधव हिला जेजुरी येथील माळवदकर कुटुंबांनी घेतले दत्तक! संपूर्ण शालेय शिक्षणांची घेतली जबाबदारी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आता खंडकरी शेतकऱ्यांच्या शर्तीच्या जमीनी भोगवटा वर्ग १ होण्याचा मार्ग मोकळा! मंत्रीमंडळात निर्णय! 

आता खंडकरी शेतकऱ्यांच्या शर्तीच्या जमीनी भोगवटा वर्ग १ होण्याचा मार्ग मोकळा! मंत्रीमंडळात निर्णय! 

November 29, 2023
सरकारला जाग आली.. आता ट्रान्सफॉर्मर जळाला, तर लगेच महावितरणला कळवा!

वीजचोरीची रक्कम भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत नाही. सासवडच्या साईनाथ आईस फॅक्टरीला जिल्हा न्यायालयाचा दणका!

November 29, 2023
वरवंडला यात्रेदिवशीच जबरी घरफोडी! सोने,चांदी आणि रोख रक्कमेसह आठ लाखांचा ऐवज चोरट्याने केला लंपास!

वरवंडला यात्रेदिवशीच जबरी घरफोडी! सोने,चांदी आणि रोख रक्कमेसह आठ लाखांचा ऐवज चोरट्याने केला लंपास!

November 29, 2023
महाराष्ट्र कुस्ती चॅम्पियन सागर बिराजदार  पाटसच्या आखाड्यातील विजेता! मैदानी कुस्तीने डोळ्याचे पारणे फिटले!

महाराष्ट्र कुस्ती चॅम्पियन सागर बिराजदार पाटसच्या आखाड्यातील विजेता! मैदानी कुस्तीने डोळ्याचे पारणे फिटले!

November 29, 2023
बारामतीत संविधान गौरव बाईक रॅली!

बारामतीत संविधान गौरव बाईक रॅली!

November 28, 2023
राष्ट्रवादीचा पहिल्यांदाच थेट घाव! इतिहासातल्या अनाजीपंतांचा दाखला, आताचा अनाजीपंत महाराष्ट्र धर्म संपवतोय!

राष्ट्रवादीचा पहिल्यांदाच थेट घाव! इतिहासातल्या अनाजीपंतांचा दाखला, आताचा अनाजीपंत महाराष्ट्र धर्म संपवतोय!

November 28, 2023
बारामतीतील कटफळ हद्दीत पुन्हा विमान कोसळले! आठवड्यातील दुसरी घटना!

एक तर विमानं दोन वेळा पडली, चौकशीला सुरुवात केली; तर धमकावले, शासकीय कामात अडथळा आणला! बारामतीतील रेड बर्ड या कंपनीच्या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल!

November 27, 2023
यंदाच्या हंगामात छत्रपती कारखाना उसाचा पहिला हप्ता 2900 रुपये देणार!

छत्रपतीच्या संचालक मंडळाने दिलेला शब्द पाळला! पहिल्या पंधरवड्याच्या ऊसाचा ३ हजार रुपये एकरकमी पहिला हप्ता उद्या बॅंक खात्यात! बिगर अॅडव्हान्स ऊस तोडणी व वाहतुकीचे पंधरवड्याचे बिलही उद्याच!

November 27, 2023
देहाची माती करून ध्येयासाठी समर्पण करणारी ही मंडळी! त्यांना, त्यांच्या विचारांना रोख सके तो रोख लो!

देहाची माती करून ध्येयासाठी समर्पण करणारी ही मंडळी! त्यांना, त्यांच्या विचारांना रोख सके तो रोख लो!

November 26, 2023
विजापूर शहरात आजही आहेत, अफजल खानाच्या बायकांच्या 63 कबरी..!

विजापूर शहरात आजही आहेत, अफजल खानाच्या बायकांच्या 63 कबरी..!

November 26, 2023
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group