अनिल गवळी : महान्यूज लाईव्ह
विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व भारतीय योग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग्य दिन साजरा करण्यात आला.
2015 पासून प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. यावर्षीही भारतीय आयुष मंत्रालय ने आंतराष्ट्रीय योग दिन यासाठी एक संकल्पना निवडली, “योग फॉर ह्यूमॅनिटी” याचा अर्थ मानवतासाठी योग ही संकल्पना घेऊन आज विद्यालयात आंतराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी भारतीय योग संस्थेचे साधक सुधाकर शेट्टी, भरतभाई पटेल, सुरेखा महिंद्रकर, शैलजा बोराटे व भुवनेश्वरी देसाई यांनी विद्यार्थ्याना योगाचे विविध प्रकार सांगून त्यांचे प्रात्यक्षिके करून घेतली. ही संस्था गेली 65 वर्ष योगाचे मोफत प्रशिक्षण देत असून पुण्यामध्ये जवळजवळ 320 ठिकाणी हे कार्य चालू आहे. संस्थेचे संस्थापक प्रकाशलाल देसराज यांनी यामध्ये मोलाची मदत केली.
विद्यालयाचे प्राचार्य लहू वाघुले यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून असे सांगितले की धन, पैसा, श्रीमंती यापेक्षा आरोग्य संपत्तीकडे विशेष लक्ष द्यावे. सुख, शांती, आरोग्य प्राप्त करून अभ्यासात लक्ष केंद्रित करावे.
याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षिका उज्ज्वला पगारे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाची माहिती आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून दिली. विद्यालयातील 630 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.
विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब शिवरकर ( माजी राज्यमंत्री), सचिव चंद्रकांत ससाणे सर, वानवडी गावचे सरपंच दत्तोबा जांभुळकर, सन्मित्र बँकेचे चेअरमन सुनील गायकवाड, माजी नगरसेविका कविताताई शिवरकर, माजी नगरसेवक अभिजित शिवरकर, सर्व संचालक मंडळ, सोनाली परदेशी, गौरी शिवरकर, पुंडलिक गवळी, सोपानराव गवळी, सूर्यकांत देडगे, यशवंत झगडे, मनोज खंडेलवाल, प्राचार्य लहू वाघुले यांनी योग दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विद्यालयातील गोरक्षनाथ केंदळे, मॅचिंद्र रकटे, अरविंद शेंडगे, घनशाम पाटील, आदी शिक्षक संगिता भुजबळ, कल्पना पैठणे, वहिदा अवटी, दीपा व्यवहारे, आशा भोसले, दीपाली शिवरकर, नलिनी गायकवाड आदी शिक्षिका तसेच दीपक जांभुळकर, कैलास वाडकर, विवेक कांबळे, अभिषेक शिवरकर आदी शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा ससाणे यांनी केले तर आभार युवराज देशमुख यांनी मानले.