दौंड तालुक्यातुन संघटित जन आंदोलन उभारण्याची आवश्यकता! ओबीसी नेते पांडुरंग मेरगळ यांचे सोशल मीडियातुन आवाहन!
राजेंद्र झेंडे : महान्युज लाईव्ह
दौंड : महाष्ट्रातील ओबीसींच्या राजकीय आरक्षण संपुष्टात आलेच आहे. आता ओबीसींनी जागृत न झाल्यास येत्या काळात शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधील आरक्षण ही संपुष्टात येणार असल्याची भिती आहे. ओबीसींच्या भावी पिढ्यांना शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधील आरक्षण टिकवण्यासाठी आता विविध जातीत विखुरलेल्या ओबीसीनी संघटित होऊन जन आंदोलन उभारण्याशिवाय पर्याय नाही. याची सुरुवात दौंड तालुक्यातुन होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे अध्यक्ष आणि ओबीसी नेते पांडुरंग मेरगळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओबीसींनो जागृत व्हा,सावध व्हा, संघटित व्हा.. असे आवाहन केले आहे.
या देशातील मोठा वर्ग म्हणजे ओबीसी जो स्वंतत्र पुर्वी शुद्र म्हणून चार्तवर्ण वर्णात गणला गेला, त्यांना हक्क,अधिकार, न्याय नाकारण्यात आला. या वर्गाला भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ३४० या कलमात एकत्रित केले. महात्मा फुले यांना अपेक्षित आणि राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांच्या संस्थानात लागु केलेले आरक्षण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या पानात बंदिस्त करीत आरक्षण रुपी हक्क आणि अधिकार दिले. मात्र या देशातील प्ररस्थापीत सत्ताधारी आणि विरोधकांनी घटनेने दिलेले आरक्षण तर दिलेच नाही उलट ते संपवून टाकण्याचे षडयंत्र रचले गेले.
यातुनच मंडल आयोगाला विरोध झाला. मात्र ओबीसींच्या हितासाठी असलेला हा लढा हा आंबेडकरी चळवळ अर्थात दलित संघटनांनी जन आंदोलन च्या माध्यमातून देशभर लढला. त्यावेळी ओबीसीं हा जागा झाला नाही परिणामी ओबीसींची आज जी अवस्था झाली आहे त्याच केवळ ओबीसीच जबाबदार आहे.
घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला आहे तो आता ओबीसींनी स्विकारण्याची गरज आली आहे. महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांनी ओबीसी आरक्षणचा एकदाचा सोक्ष मोक्ष लावून टाकला .आता येत्या काळात ओबीसींचे शैक्षणिक व नोकऱ्यातील आरक्षण असेच धृतराष्ट्राच्या चालीने संपविले जाईल.असंघटित ओबीसींना हे समजण्याच्या अगोदर या आरक्षणावर डोळा ठेऊन बसलेल्या प्रस्थापित जातीला ते देऊन टाकले जाईल आणि नंतर ओबीसींच्या आरक्षणाचा लढा लढायला पुतना मावशीचे प्रेम अंगिकरून सर्व राजकीय पक्ष वर्षानुवर्षे खोटा लढा देत राहतील .
ओबीसी प्रवर्गातील गुलामी वृत्ती, प्रस्थापितांचे पाय चाटण्याची हीन प्रवृत्ती व उपजत खेकडा संस्कृती त्यामुळे लोकशाही व्यवस्थेत सुद्धा लोकांना गुलामीत ठेवता येते हे गेले 70 वर्षे या देशात सप्रमाणे सिद्ध झालेले आहे .
ज्या सुशिक्षित वर्गांकडून समाजबांधणीची अपेक्षा करायची त्यांचे मॉरल (अवस्था)तर गरीब शेतमजुरापेक्षाही खालच्या पातळीवर झाली आहे .त्यामुळे सामाजिक क्रांतीजी ओबीसींमध्ये व्हायला पाहिजे ती होत नाही ही मोठी शोकांतिका आहे. या मार्गावर ओबीसींच्या न्याय हक्क अधिकारांसाठी अनेक प्रमुख मंडळी चालायला तयार होताहेत पण आपल्यातीलच पोटार्थी भुरटे क्षणिक लाभांसाठी प्राथमिक स्थरावरच या चळवळीचा (विचारांचा)गळा घोटताहेत .
अनेक सहकाऱ्यांच्या विचारविमर्शानंतर या मार्गावर चालायचे ठरवतो आहे. याची सुरुवात दौंड तालुक्यातून करायची हे ठरत आहे. पण या अभियानाला तळागातून साथ देण प्रत्येक ओबीसी घटकाचे काम आहे. एक तर आपण ओबीसी आहोत ते इथल्या धनगर, माळी, तेली, नाभिक, लोहार, सुतार, गुरव, वाणी, भराडी, कैकाडी अशा अनेक जातींमध्ये विखुरलेल्या अर्ध शिक्षित लोकांना माहीतच नाही.
शिवाय त्याचे फायदे तोटेही माहीत नाहीत. माहीत करून घ्यावे असे त्यांना यत्किंचितही वाटत नाही. याला सर्वस्वी त्यांच्यात भिनवलेली बलुतेदारी, अलुतेदारीची परंपरा आणि आपल्यातीलच आडदांड जातींनी गरीब अल्पसंख्याक ओबीसी जातींचे गावपातळीवरच गेलेले खच्चीकरण, ठराविक गावागावात असलेली त्यांची लोकसंख्या ज्यांमुळे कितीतरी जातींना साधं ग्रामपंचायतीचा सदस्य होणेही पिढ्यांनपिढ्या दुरापास्त आहे. अशा अवस्थेत ओबीसींची चळवळ उभी करणे हे किती खडतर कार्य आहे. याची कल्पना न केलेलीच बरी.
तरीसुद्धा ज्या प्रकारची शिकलेली सवरलेली माणसं अवतीभवती आहेत व गेल्या अनेक वर्षांपासून या विषयावर चिंतन मनन झाले आहे.त्यामुळे या वेदनादायक अध्यायाला सुरुवात करत आहोत .अनेक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साथी या अभियानात असणार आहेत.
महाराष्ट्रातील माझ्या बंधू -भगिनींनी ओबीसींच्या उत्थानाच्या या पवित्र कार्यात आपापल्या कार्यक्षेत्रात आपापल्या परीने कार्यरत राहा. आपणा सर्वांना योग्य वेळी एकत्रिकरणाच्या दिशेन जायचे आहे. थोडा वेळ लागेल, पण आपल्या न्याय हक्क अधिकारांपर्यंत निश्चित पोहचू. कारण आपली संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे इथून पुढे ” जो ओबीसीं की बात करेगा वही देशपर राज करेगा “हा नारा घेऊन चालायचे आहे हे ध्यानी असू द्यावे .
दौंड तालुक्यातून “जागो ओबीसी जागो, जागते रहो सावधान ” हे ओबीसींचे आंदोलन तीव्र करण्याचे योजिले आहे. ज्यांना ज्यांना यात उडी घ्यायची आहे त्यांचे स्वागत आहे . असे आवाहन ओबीसी नेते पांडुरंग मेरगळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओबीसी समाजाला केले आहे.