दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील शाळा महाविद्यालय कॉलेज आज आंतरराष्ट्रीय योग दिन हा विविध खेळांचे प्रात्यक्षिक करून साजरा करण्यात आला. २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून सर्वत्र साजरी करण्यात येतो.
या दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (दि २१ ) दौंड शहरासह, पाटस,वरवंड, केडगाव, कुसेगाव, कुरकुंभ तसेच तालुक्यातील अनेक शाळा उच्च व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना विविध योगांचे प्रात्यक्षिक करून त्याचे महत्व पटवून देण्यात आले.
योगा नियमित केल्यास आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. आरोग्य निरोगी राहण्यासाठी योगा हा नियमित करावा असा संदेश या निमित्ताने शाळा – महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.
पाटस येथील नागेश्वर विद्यालयात योग गुरू आप्पा खेतमाळीस यांनी योगाचे विविध प्रकार प्रात्यक्षित स्वरूपात विद्यार्थ्यांना करून दाखवले, तसेच कै. एम. व्ही. भागवत येथेही शिक्षकांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांना योगाचे महत्व आणि योगाचे धडे शिकवून योग दिन साजरा करण्यात आला.