मुंबई : महान्यूज लाईव्ह
रात्री ९.५० वा – विधानपरिषेच्या निवडणूकीतही भाजपाची सरशी कायम असून आतापर्यंत पाचपैकी चार उमेदवार निवडून आले आहे. त्यांचे पाचवे उमेदवार प्रसाद लाडही निवडून येण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीचे दोन आणि शिवसेनेचे दोन उमेदवार पहिल्या फेरीत निवडून आले असून कॉंग्रेसचे दोनही उमेदवारांचे भवितव्य दुसऱ्या फेरीवर अवलंबून आहे.
रात्री १० . ३९ – कॉंग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत, तर भाई जगताप विजयी. भाजपाचे प्रसाद लाडही विजयी.