मुंबई : महान्यूज लाईव्ह
दुचाकी किंवा चारचाकी चालविणाऱ्या बायकांपासून सर्वसामान्य पुरुष वाहनचालक सहसा सावधच असतात. जर चुकून अपघात घडलाच तर चुक कोणाचीही असो, आसपासच्या माणसांची सहानुभुती ही बाईलाच मिळणार, आणि पुरुषाला मार पडणार हे ठरलेलेच असते. याचाच फायदा अनेकदा बायका उचलतात. चुक त्यांची असली तरी तातडीने त्या समोरच्या पुरुषावर खापर फोडतात.
सोशल मिडियावर अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतो. हा व्हिडिओ अगोदर पहा, पण यावर भाष्य करु …
आता या व्हिडिओत एक बाई तिच्या दुचाकीला झालेल्या अपघातासाठी तिच्या मागून येत असलेल्या बाईकस्वाराला दोषी ठरविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. प्रत्यक्षात या बाईकस्वाराचा त्या महिलेच्या दुचाकीला साधा स्पर्शही झालेला नाही. ही महिला तिच्या पतीसह दुचाकीवरून प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्या गाडीचा तोल जावून ते पडले. त्यांच्या मागून एक दुचाकीस्वार येत होता. तो दुचाकीस्वार त्यांच्या गाडीपासून अगदी सुरक्षित अंतरावर होता. मात्र ही महिला या अपघाताचे खापर त्या तरुणावर फोडताना या व्हिडिओत दिसत आहे. त्याच्या अंगावर ती जोरजोरात ओरडताना दिसते आहे.
पण या दुचाकीस्वाराच्या हेल्मेटवरील कॅमेऱ्यात सगळे चित्रित झाले होते. यामुळे या महिलेचा दावा सपशेल खोटा ठरून तो तरुण बचावला, नाहीतर या अपघाताला विनाकारणच या तरुणाला जबाबदार धरले गेले असते.
हा व्हिडिओ लोक मोठ्या प्रमाणात बघत आहेत, आणि त्यावर कॉमेंटही करत आहेत. पण हा व्हिडिओ नेमका कुठला आणि केव्हाचा आहे हे काही स्पष्ट होऊ शकलेले नाही. ‘ वो तो कैमरा था नही तो दिदी तो अपना खेल खेल चुकी थी ‘ अशा एका नेटकऱ्याची कॉमेंट हीच बहुतेक सर्वांची भावना आहे.