इंदापूर तालुका युवक काँग्रेसची वालचंदनगर येथे हातात मशाल व निषेध फलक घेऊन निदर्शने..
— राहुल गांधी झिंदाबाद, कुठची इडी – लावा काडी, युवक काँग्रेस झिंदाबाद, मोदी सरकार हाय हाय..केली घोषणाबाजी..!!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : दिल्ली पोलिसांनी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात घुसून येथील काँग्रेस कार्यकर्त्यांना केलेल्या मारहाणीचा इंदापूर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने वालचंदनगर येथे हातात मशाल व निषेध फलक घेऊन निषेध करण्यात आला.
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांच्यावर केंद्र सरकारने ईडीच्या मदतीने सूडबुद्धीने बदनाम करण्याचे काम सुरू केले आहे. दिल्ली पोलिसांनी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात घुसून येथील काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण केली, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
त्याच पद्धतीने अग्नीपथ या अन्यायकारक लष्कर भरती विरुद्ध युवक कॉंग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या आदेशानुसार व युवक काँग्रेसचे सरचिटणीस विजयसिंह चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गार्डन चौक, वालचंदनगर येथे शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता इंदापूर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष मिलिंद साबळे यांचा नेतृत्वा खाली मशाल व हातात निषेध फलक घेऊन निदर्शने करण्यात आली.
यावेळी राहुल गांधी झिंदाबाद, कुठची इडी – लावा काडी, युवक काँग्रेस झिंदाबाद, मोदी सरकार हाय हाय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अभिजीत गोरे, युवक नेते किरण पासगे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अरुण राऊत, इंदापूर शहर युवक काँग्रेस उपाध्यक्ष सुफियान जमादर, संदीप भोसले, इंदापूर युवक सरचिटणीस संदीप शिंदे, अनिकेत जाधव, संतोष शेंडे,सिद्धार्थ गायकवाड, योगेश चव्हाण, मकरंद गायकवाड व युवक काँग्रेसचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.