दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरातील कोरोनामुक्त झालेल्या राज्य राखीव दल गट क्रमांक 5 मध्ये कोरोनाने पुन्हा एकदा शिरकाव केला आहे. आज कोरोनाअहवालात 6 जवानांना कोरोनाची लागण झाली असून 105 पैकी उर्वरीत 99 जणांचा तपासणी अहवाल हा निगेटिव्ह आला आहे.
ही माहिती ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली. काल शुक्रवारी ( दि. 14 ) दौंड शहरातील व राज्य राखीव दलातील कोरोना बाधीत व्यक्तींच्या संपर्कातील 105 व्यक्तींची शहरातील येथील कोवीड सेंटर मध्ये कोरोना तपासणी करण्यात आली, यामध्ये राज्य राखीव गटाच्या 30 ते 54 वयोगटातील ६ जवांनाचा अहवाल हा पॅाझिटिव्ह आला.
दरम्यान,दौंड शहरासह तालुक्यातील ग्रामिण भागातील कोरोना संसर्गाचा वेग मंदावत चालला आहे. मागील काही दिवासापासून कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह व्यक्तींची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.











