इंदापूर : महान्यूज लाईव्ह
निरवांगी (ता.इंदापूर) येथील पद्मभूषण वसंत दादा पाटील माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९७:१४ टक्के निकाल लागला आहे. संस्थेने दरवर्षीप्रमाणे यंदाही चांगल्या निकालाची परंपरा विद्यालयाने राखली आहे.
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये दर्जेदार शिक्षण संस्था म्हणून इतर संस्थान प्रमाणे नंदकिशोर एज्युकेशन सोसायटी च्या पद्मभूषण वसंत दादा पाटील माध्यमिक विद्यालय निरवांगी या संस्थेची परिसरात ओळख निर्माण होत आहे.
या विद्यालयमध्ये मेघा मोहन रासकर हिने ९३:६६ टक्के गुण मिळवून प्रथम, स्नेहल सुनील कचरे हिने ९१.६० टक्के गुण मिळवून द्वितीय स्थान पटकावले. याच बरोबर निरवांगी येथील संजोती बापू बोबडे हिने ९१:४० टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला. या शाळेचा एकूण निकाल ९७:१४ टक्के लागला आहे.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.प्रा.हणमंत पोळ, उपाअध्यक्ष विठ्ठल पवार, सचिव पांडुरंग पोळ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संस्था पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याद्यापक श्री. शिरसट, सर्व शिक्षक , शिक्षेकेतर कर्मचारी व निरवांगी ग्रामस्थांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.