मुंबई : महान्यूज लाईव्ह
पंतप्रधान पदाला बारा वर्षे पुर्ण झाल्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपद सोडून देतील अशी भविष्यवाणी वर्तविण्यात आलेली आहे. महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर ही भविष्यवाणी केली आहे.
ग्रह नक्षत्रांच्या आधारे केलेल्या या भविष्यवाणीनूसार २०२४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी भाजपाला पुन्हा एकदा मोठे यश मिळवून देतील. त्यानंतर दोन वर्षात ते पंतप्रधानपद सोडून देतील असे त्यांनी म्हणले आहे. त्यानंतर मोदी राजकारणापासूनच लांब जातील असेही त्यांचे भाकित आहे.
उत्तर प्रदेशातील महोबामध्ये स्वजन शिष्य संमेलनाच्या कार्यक्रमात बोलताना महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी हे भाकित वर्तवले आहे. २०१४ मध्ये मोदी देशाचे पंतप्रधान झाले. २०२६ मध्ये त्यांना पंतप्रधान म्हणून १२ वर्षे पुर्ण होतील. त्यामुळे २०२६ मध्ये ते राजकारणापासून लांब जातील. त्यांची जागा सध्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांभाळावी अशी इच्छा गिरी यांनी व्यक्त केली आहे.
योगी आदित्यनाथ भविष्यात पंतप्रधान व्हावे याची चर्चा आता दबक्या आवाजात सुरु झाली आहे.