मुंबई : महान्यूज लाईव्ह
स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘ रंग माझा वेगळा ‘ ही मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिपा आणि कार्तिक यांच्यासोबत दिपिका आणि कार्तिकी या त्यांच्या दोन मुलींनीही प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मात्र आता या मालिकेतील कार्तिकीची भुमिका साकारणारी बालकलाकार साईशा भोईर हिने ही मालिका सोडली असल्याची माहिती पुढे येत आहे.
साईशााला एक नव्या प्रोजेक्टची ऑफर मिळाल्याने तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच साईशा मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याचे बोलले जात आहे.
साईशाच्या आईवडिलांनीही याला दुजोरा दिला आहे. साईशाला शुटिंगसाठी जाणे आणि येण्यासाठी दोन तास लागतात. त्यामुळे तिला शाळेत जाण्यासाठी तसेच अभ्यासासाठीही वेळ मिळत नव्हता. त्यामुळे तिच्या तब्येतीवरही परिणाम होऊ लागला होता. याचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे.
साईशा लवकरच रुपेरी पडद्यावर काम करताना दिसणार आहे. तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती सोशल मिडियातून आम्ही देऊच असेही तिच्या आईवडिलांनी सांगितले आहे. दरम्यानच्या काळात साईशा शाळेत जाऊन अभ्यासावर लक्ष केंद्रीत करणार आहे.
सध्या रंग माझा वेगळा या मालिकेला पहिल्या क्रमांकाचे टीआरपी रेटींग आहे. साईशाने ही मालिका सोडल्यानंतर प्रेक्षकांचे प्रेम तेवढेच राहते की कमी होते हेच आता पहावे लागेल.