दौंड : महान्युज लाईव्ह
केंद्र सरकार राजकीय सूडबुद्धीने विरोधी पक्षातील नेत्यांना व कॉंग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांना खोट्या केसेस मध्ये गुंतवून विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचे काम करीत आहे, असा आरोप करीत दौंड तालुका युवक काँग्रेस व शहर काँग्रेसने केंद्रसरकारच्या या दडपशाहीच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.
केंद्रातील मोदी-शहा सरकार हे ई.डी, सी बी आय, एक सी बी, इन्कमटॅक्स, सारख्या तपास यंत्रणाचे गैरवापर करीत आहे. आता तर अग्नीपथ या योजनेच्या माध्यमातून अन्यायकारक लष्कर भरती करण्याचा कुटील डाव करीत आहे. या विरोधात दौंड तालुका युवक काँग्रेस व शहर काँग्रेस च्या वतीने शुक्रवारी ( दि. १७ ) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मशाल व हातात निषेध फलक घेऊन केंद्र सरकार च्या विरोधात जोरदार निदर्शन करण्यात आली. यावेळी मोदी शहा यांच्या वर घोषणाबाजी करत टिका करण्यात आली.
याप्रसंगी पुणे जिल्हा पर्यावरण जिल्हाध्यक्ष तन्मय पवार, दौंड शहर अध्यक्ष हरेष ओझा, युवक तालुका अध्यक्ष श्रेयस मुनोत, अल्पसंख्यक कॉंग्रेस शहराध्यक्ष रज्जाक भाई शेख, अतुल थोरात, अतुल जगदाळे, विठ्ठल शिपलकर,जमीर सय्यद, सुरेश क्षिरसागर,सलीम शेख, विनोद नगरे,वसीम सय्यद आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.