शिरूर : महान्यूज लाईव्ह
पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने संतोष जाधव टोळीतील सात आरोपींना अटक केली असून या आरोपींकडून १३ पिस्तूल जप्त करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नारायणगाव पोलिस स्टेशन हद्दीत संतोष जाधव याने प्लॉट व्यावसायिकास पाच ते सहा महिन्यांपूर्वी ५० हजार रुपयांची खंडणी मागितली होती. त्यानंतर आरोपी संतोष जाधव याने पुन्हा फिर्यादी प्लॉट व्यावसायिकाकडे ५० हजार रुपयांची मागणी केली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी संतोष जाधव यास अटक केल्यानंतर प्लॉट व्यावसायिकाने संतोष जाधव याच्या विरोधात खंडणीची फिर्याद दिली होती. दरम्यान या गंभीर गुन्ह्याची दखल घेत संतोष जाधव याने खंडणी मागण्याकरिता कोणाला सांगितले याची माहिती घेत असताना त्याने जिवनसिंग दर्शनसिंग नहार, ( वय २३ वर्षे, रा. मंचर ) व श्रीराम रमेश थोरात, ( वय ३२ वर्षे, रा. मंचर ) यांची नावे सांगितल्याने त्यांना अटक केली. त्यावेळी जिवनसिंग नहार याचेकडून १ गावठी पिस्टल व २ मोबाईल फोन तसेच श्रीराम थोरात याचेकडून १ गावठी पिस्टल व १ मोबाईल फोन जप्त करून आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची ६ दिवसांची पोलीस कोठडी रिमांड न्यायालयाने सुनावली आहे.
त्यादरम्यान त्यांचेकडे अधिक तपास केला असता आरोपींनी सांगितले की, संतोष जाधव याने जयेश रतीलाल बहिराम, (वय २४ वर्ष, रा घोडेगाव ) व त्याचे साथिदारास मनवर, मध्यप्रदेश येथे गावटी पिस्टलचा साठा आणण्यासाठी पाठविले होते. त्याप्रमाणे त्यांनी गावठी पिस्तूल आणल्यानंतर संतोष जाधव याने सांगितल्याप्रमाणे वैभव ऊर्फ भोला शांताराम तिटकारे, ( वय १९ वर्ष, रा. जळकेवाडी, चिखली ), रोहीत विठ्ठल तिटकारे, ( वय २५ वर्षे, रा. सरेवाडी, नायफड ),सचिन बबन तिटकारे, ( वय २२ वर्ष, रा. धाचेवाडी, नायफड ), निशान इलाईश मुंढे ( वय २० वर्षे, रा. घोडेगाव ), जिवनसिंग दर्शनसिंग नहार, श्रीराम रमेश थोरात, व विधी संघर्शित बालक यांचेसोबत मिळून कट करून त्या सर्वांचे वतीने जीवनसिंग नहार, श्रीराम चौरात व बालक यांनी खंडणीची रक्कम आणण्यासाठी पाठवायचे असे ठरविले होते. त्यानुसार जिवनसिंग नहार, श्रीराम थोरात व विधी संघर्शित बालक यांनी बोलेरो गाडीतून जाऊन जिनसिंग नहार यांनी खंडणीची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर जयेश बहिरम याची घरझडती घेतली असता त्याच्याकडे ५ गावठी पिस्तूल व १ मोबाईल अशा वस्तु मिळून आल्या. त्यामुळे त्यास ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याने निशान मुंढे यास १ गावठी पिस्टल दिले असल्याची माहिती दिली. त्यानुसार जिशान मुंढे याचेकडून ९ गावठी पिस्तूल व १ मोबाईल फोन जप्त केला.
वैभव ऊर्फ भोला शांताराम तिटकारे याचेकडे १ गावठी पिस्टल दिल्याची माहिती दिली. त्यावरून वैभव ऊर्फ भोला तिटकारे याचेकडून १ गावठी पिस्टल व १ मोबाईल जप्त केला. सचिन बबन तिटकारे यांचेकडे १ गावठी पिस्तूल दिल्याची माहिती दिली त्यावरून सचिन तिटकारे याचेकडून १ गावटी पिस्तूल व १ मोबाईल फोन पोलिसांनी हस्तगत केला. रोहीत तिटकारे याचेकडे ३ गावठी पिस्टल, १ मॅक्झीन, १ बुलेट कॅरीयर दिल्याची माहिती दिली त्यावरून रोहीत तिटकारे कडून ३ गावटी पिस्टल, १ मॅक्झीन, १ बुलेट कॅरीयर १ बॅग अशा वस्तु हस्तगत केल्या आहेत. त्यांना अटक करण्यात आलेली आहे. अशाप्रकारे आत्तापर्यंत १३ गावटी पिस्तूल, १ बुलेट कॅरियर व १ मॅक्झीन अशा वस्तु जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच गुन्हा करण्याकरीता वापरलेली बोलेरो गाडी नं. एच. आर.०७ ए.डी.०६८५ ही देखील पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली आहे.
सदर गुन्हयाचा तपास चालू असून नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, हे करीत आहेत. यापुढे देखील पुणे ग्रामीण पोलीसांकडून संतोष जाधव याचे संपर्कात असणारे मुलांची कसून चौकशी करण्यात येणार आहे.
हा तपास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक,मितेश पट्टे, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके,सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे,पोलिस हवालदार दिपक साबळे, राजू मोमीन,विक्रम तापकीर,गुरू जाधव,संदिप बारे,अक्षय नवले,निलेश सुपेकर,दगडु बोरकर, तसेच सहायक फौजदार पासलकर, तुषार पंदारे,सहायक फौजदार पठाण, महेश बनकर, पो. हवा, जनार्दन शेळके, पो. हवा, अतुल डेरे, पो. हवा. अजित भुजबळ, पो.हवा.कारंडे, पो.हवा.शेख, पो.हवा. दत्तात्रय तांबे, पो. ना. नागरगोजे, पो. कॉ. प्रसन्नजीत घाडगे, सहा. फौज मुकुंद कदम आणि नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलिस उपनिरीक्षक सुनील धनवे, पो.स.ई.विनोद दुबे, पो.ना. धनजंय पालवे, पो. कॉ. शैलेश वाघमारे, पो. कॉ. सचिन कोयल, पो. ना. नवीन अरगडे यांच्या पथकाने केली आहे.