मुंबई : महान्यूज लाईव्ह
केंद्र सरकारने लष्करभरतीसाठी सुरु केलेल्या अग्नीपथ योजनेला देशभरातून मोठा विरोध सुरु आहे. रस्त्यावर उतरलेल्या तरुणांनी रेल्वे जाळल्या आहेत. करोडो रुपयांच्या राष्ट्रीय संप्पतीची हानी केली आहे. या तीव्र विरोधानंतरही भारतीय सेना अग्नीपथच्या अंमलबजावणीवर ठाम आहे. स्थलसेनाप्रमुख मनोज पांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
ही भरती प्रक्रिया सुरु करण्यासाठीचे नोटीफिकेशन पुढील दोन दिवसातच काढले जाणार आहे. त्यानंतर भरतीबाबतचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. डिसेंबर २०२२ पूर्वी अग्नीवीरांच्या पहील्या बॅचचे प्रशिक्षण सुरु होईल. तरुणांना भारतीय सेनेत सहभागी होण्याची मोठी संधी यातून मिळणार आहे, त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन पांडे यांनी केले आहे.
वायूसेना प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी यापूर्वीच २४ जूनपासून वायुसेनेतील भरतीची प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती दिली आहे. कोरानामुळे दोन वर्षे कोणतीही भरती झाली नव्हती. त्यामुळे यावर्षी वयाची कमाल मर्यादा २३ वर्षे करण्याचा निर्णय केंद्रसरकारने घेतला आहे. त्यामुळे यावर्षी १७.५ ते २३ वर्षाच्या युवकांना या भरतीत सहभागी होता येणार आहे.
युवकांनी या भरतीसाठी तयारी सुरु करावी असे आवाहन लष्कराकडून करण्यात आले आहे.
Jithe virodh aahe nemke tech karayla bjp la aavadte