सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकूंद गोकुळदास शहा यांच्या वाढदिवसानिमीत्त कर्मयोगी सह. साखर कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष गोकुळदास (भाई) शहा यांच्या मार्गदर्शनाखाली शहा बंधूंनी इंदापूर तालुका आणि शहरातील युवक-युवतींच्या उज्वल भविष्यासाठी नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, इंदापूरच्या माध्यमातून खास नोकरी मोहोत्सवाचे आयोजन केले आहे.
भव्य नोकरी महोत्सव उद्या शनिवारी (दि.१८ जून) रोजी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे..
आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी शहा परिवाराकडून नोकरीची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. ८ वी ते १२ वी, बी.ए. एम.ए., बी. कॉम. एम. कॉम., बी. एस. सी.,एम. एस. सी., बी. एस. ए.,एम. सी.ए.,बी. बी. ए., एम. बी. ए.,आय.टी.आय., बी.ई. (ऑल फॅकल्टी) डिप्लोमा, सिव्हील पदवीधर व पदव्युत्तर या सर्वांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे.मॅनुफॅक्चरिंग, फायनान्स रिटेल, सेल्स व मार्केटिंग बँकिंग, इन्श्युरन्स, हॉस्पिटॅलीटी, फॅसिलीटी टेलिकॉम व इतर आय.टी., बी.पी.ओ./ के.पी.ओ., फार्मा या क्षेत्रात इच्छुकांना नोकरीची संधी मिळू शकणार आहे.
यामध्ये सहभाग नोंदण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी बायोडेटा, शैक्षणिक प्रमाणपत्रे, पासपोर्ट साईज फोटो,आधार कार्ड, मतदान कार्ड इ.माहिती ५ प्रतीत सोबत आणावी. तत्पूर्वी इच्छुकांनी 9921777889, 9665186545 या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करणे गरजेचे आहे. याशिवाय आपली कागदपत्रे सोबत घेऊन शहा सांस्कृतिक भवन, इंदापूर येथे समक्ष उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.