शितल अहिवळे
फलटण : महान्यूज लाईव्ह
फलटण नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक २०२२ साठी प्रभाग रचनेनुसार आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. या निवडणुकीमध्ये फलटण शहरामध्ये एकूण १३ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागांमध्ये दोन नगरसेवक निवडणूक लढवतील तर प्रभाग क्रमांक १३ या एका प्रभागांमध्ये एकूण तीन नगरसेवक असतील असे एकूण २७ नगरसेवकांच्या प्रभाग रचनेनुसार आरक्षण सोडत जाहीर झाली आहे.
जाहीर झालेल्या आरक्षणामुळे काहींच्या मनसुब्यांवर पाणी पडले आहे तर काही नवीन इच्छुक लागले पूर्ण तयारीला लागले आहेत. होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये मोठी चुरस होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, विरोधी पक्षांमध्ये असलेली राष्ट्रीय कांग्रेस पार्टी तर नव्याने उभारी घेत असलेली भारतीय जनता पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा समावेश होतो.
राष्ट्रवादीमध्ये सत्ताधारी नगरसेवकांबद्दल असलेली नाराजी आणि मोठ्या प्रमाणात नवीन इच्छुकांची मागणी हे शिव धनुष्य एनसीपीला पेलावे लागणार आहे. राष्ट्रीय काँग्रेसला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी मोठी तयारी करावी लागेल. यावेळी सत्तापालट करायचे या इर्षेने उतरणारी भारतीय जनता पार्टीला योग्य नियोजन करावे लागेल, तर वंचित बहुजन आघाडी काय करिश्मा दाखवते याकडे लक्ष असेल. म्हणूनच बहुप्रतिक्षीत असलेली आरक्षण सोडत महत्त्वाची ठरते.
फलटण नगर परिषद आरक्षण सोडत खालील प्रमाणे
प्रभाग क्रमांक – 1
अ – अनु.जाती – महिला
ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 2
अ – अनु.जाती – महिला
ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 3
अ -अनु.जाती – सर्वसाधरण
ब -सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक – 4
अ -अनु.जाती – महिला
ब -सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 5
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 6
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 7
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 8
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 9
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 10
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 11
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 12
अ – अनु.जाती सर्वसाधारण
ब -सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक – 13
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारणमहिला क-सर्वसाधारण