मुंबई : महान्यूज लाईव्ह
कोरोनाच्या रुग्णसंख्येत होत असलेल्या वाढीमुळे आता चौथी लाट येत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ४ हजार २५५ रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी २ हजार ३६६ हे मुंबईत सापडले आहेत. याच २४ तासात राज्यात दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे. मुंबईतील संक्रमण द १५.११ टक्क्यांवर वाढला आहे.
दुसरीकडे देशाची राजधानी दिल्लीतही कोराना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. मागील दहा दिवसात दिल्लीत ७ हजार १०० हून अधिक रुग्ण सापडले आहे. दिल्लीतील संक्रमण दरही ७.०१ टक्क्यावर पोचला आहे.
केरळमध्ये बुधवारी ३ हजार ४१९ नवीन रुग्ण आढळले आहेत. देशात गेल्या २४ तासात १२ हजार २१३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
अशा प्रकारे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत राहिली तर पु्न्हा मास्क सक्ती केली जाण्याची शक्यता आहे.