मुंबई : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्रात बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी आणि पालक दहावीच्या निकालाची वाट पहात आहे. मात्र अजूनही निकालाची तारीख जाहीर झाली नसल्याने त्यांच्यात अस्वस्थता वाढली आहे. मात्र २० जूनपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
यंदा या परीक्षेसाठी १६ लाखाहून जास्त विद्यार्थी बसले होते. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काही आठवड्यापूर्वी १५ जूनला निकाल लागतील अशी माहिती दिली होती. त्यामुळे काल विद्यार्थी व पालकांनी निकाल जाहिर होण्याची प्रतिक्षा केली. परंतू त्यांच्या पदरी निराशाच आली आहे.