बिहारमध्ये अजब आणि गजब घटना घडतात. बिहारमधील बेगूसराय जिल्ह्यातील मोहटा गावात एक अजब घटना घडली. गुरांना तपासण्यासाठी डॉक्टरला बोलावले. डॉक्टर त्या गोठ्याच्या मालकाच्या मुलीला आवडला, मग मालकांनी थेट डॉक्टर बरोबर जबरदस्तीने तिचे लग्न लावून दिले..
बिहार मधील बेगूसराय जिल्ह्यातील गुरांच्या डॉक्टरच्या बाबतीत हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. याची चर्चा सध्या बिहारमध्ये जोरात सुरू आहे. हा युवक पशुवैद्यकीय व्यवसायिक असून मोर्टा या गावातील एका मालकाने फोन करून गुरे तपासण्यासाठी बोलावले. मात्र गाई तपासण्यासाठी गेलेल्या या डॉक्टरला पकडून घरातील एका मुलीसोबत त्याचे बळजबरीने लग्न लावून देण्यात आले.
डॉक्टर बराच वेळ घरी परत न आल्याने त्याचे आई-वडील शोधाशोध करू लागले, मात्र सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. अर्थात या डॉक्टरचे त्या गोठ्याच्या मालकाच्या मुलीशी प्रेमसंबंध होते अशी देखील चर्चा सुरू असून, या प्रेमसंबंधातूनच त्याचे लग्न लावून दिल्याची चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप हे लग्न बळजबरीने झाले की प्रेमसंबंधातून झाले याची पुष्टी मात्र मिळू शकलेली नाही.
Dr soma kolhe