सोनी येथील पोलीस अधिकारी कन्येची माजी सैनिक वडिलांना अनोखी भेट.!
युवराज जाधव, सांगली
सोनी : येथील श्री अरविंद गणपती पाटील माजी सैनिक आहेत. रविवारी १२ जून रोजी श्री पाटील यांचा ८० वाढदिवस होता. या निमित्ताने मुंबई पोलीस दलात फौजदार असणाऱ्या त्यांच्या कन्या नूतन पाटील यांनी सोनी येथे ८० झाडांचे वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.
सध्या झाडांची संख्या कमी होताना दिसत आहे. ग्रामीण भागात शेतीसाठी झाडांच्या सावलीमुळे पिकांचे उत्पादन कमी होते. या समजामुळे वृक्षसंख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे झाडांची संख्या वाढविण्याच्या हेतूने हा उपक्रम हाती घेतल्याचे नूतन पाटील यांनी सांगितले.
सोनी येथे करोली रोडवर असणाऱ्या मैदानाची यासाठी निवड करण्यात आली. पहाटे चालायला जाणाऱ्या नागरिकांची संख्या या रस्त्यावर जास्त असते, त्यामुळे या ठिकाणाची निवड करण्यात आली. वड, पिंपळ, जांभूळ व करंज यांसारख्या प्राणवायू देणाऱ्या देशी वाणाच्या झाडांची निवड करण्यात आली. वाढदिवसाच्या निमित्ताने गावातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांच्या अभ्यासिकेसाठी खुर्च्या देखील देण्यात आल्या.
या निमित्ताने सोनी येथील माजी सैनिक संघटनेचे व जगदंब युवा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे जयसिंग चव्हाण, माजी सरपंच सुरेश मुळीक, गजानन पाटील, तसेच श्री पाटील यांच्या परीवारातील सदस्य, गावातील विकास सोसायटीचे सदस्य जयसिंग यादव, संजय माने, सुधीर जाधव, अंकुश पाटील, अशोक पाटील, पी. बी. पाटील, रघुनाथ कुंभार व दिनकर पाटील जनसेवा केंद्राचे दीपक चव्हाण उपस्थित होते.