दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरातील शालिमार चौकात रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या आँनलाईन जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलीसांनी ६ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन सहा जणांना ताब्यात घेतले आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.
कुणाल गोपी खराटे (रा.शालिमार चौक दौंड ),पप्पू सुरेश तुपे (रा. शिरसुफळ ता. बारामती जि. पुणे ), ओमकार अंकुश गायकवाड रा दौंड ), तेजस बाबासो कांबळे (रा गोपाळवाडी ), रोहित युवराज सोनवणे (रा.दौंड ) व अब्राहम थॉमस धोरखंडे (रा.दौंड ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
शहरातील शालिमार चौकातील रस्त्यालगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदा परवाना जुगाराचा खेळ सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांचे एक पथक कारवाईसाठी तैनात करण्यात आले. यापथकाने माहिती मिळाली, त्या ठिकाणी छापा टाकला असता, अब्रहाम थॉमसन धोरखंडे ( रा शालिमार चौक) हा आपल्या ओळखीच्या लोकांना मोबाईल मधील गोलाकार आकड्याच्या बदल्यात त्यांना पैसे देऊन जुगार चा खेळ खेळवीत असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी पोलीसांनी ६ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मागील आठ दिवसातील याठिकाणी पोलीसांनी केलेली ही चौथी कारवाई आहे. पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुभाष राऊत, पोलीस शिपाई अमजद शेख, अभिजीत गिरमे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.