आरक्षण सोडत पाहण्यासाठी नगरपालिकेच्या प्रशासकीय भवन जवळ मोठी गर्दी..! प्रभाग रचनेनुसार ‘इच्छुक’ लागले तयारीला..!!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर नगरपरिषदेच्या सन २०२२ मध्ये होणाऱ्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. नुतन नगरपालिका प्रशासकिय भवन येथे ही सोडत झाली. ९ ठिकाणी सर्वसाधारण, ८ ठिकाणी सर्वसाधारण स्त्री, १ ठिकाणी अनुसूचित जाती सर्वसाधारण व २ ठिकाणी अनुसुचित जाती स्त्री उमेदवारांना संधी मिळाली आहे.
इंदापूर नगरपरिषदेच्या नव्या इमारतीत, उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली दोन बालकांच्या हस्ते आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या वेळी तहसीलदार श्रीकांत पाटील, मुख्याधिकारी रामराजे कापरे यांसह आजी- माजी नगरसेवक, शहरातील नागरिक, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
आरक्षण असे : ■ प्रभाग क्र. १ : अ) अनुसुचित जाती स्त्री, ब) सर्वसाधारण. ■ प्रभाग क्र. २ अ) सर्वसाधारण स्त्री, ब) सर्वसाधारण. ■ प्रभाग क्र. ३ अ) : सर्वसाधारण स्त्री,ब) सर्वसाधारण. ■ प्रभाग क्र. ४ : अ) सर्वसाधारण स्त्री, ब), सर्वसाधारण. ■ प्रभाग क्र. ५ : अ) सर्वसाधारण स्त्री, ब) सर्वसाधारण. ■ प्रभाग क्र. ६ : अ) सर्वसाधारण स्त्री, ब) सर्वसाधारण. ■प्रभाग क्र. ७ : अ) सर्वसाधारण स्त्री, ब) सर्वसाधारण. ■ प्रभाग क्र. ८ : अ) सर्वसाधारण स्त्री, ब) सर्वसाधारण. ■ प्रभाग क्र. ९ : अ ) अनुसूचित जाती स्त्री, ब) सर्वसाधारण. ■ प्रभाग क्र. १० : अ) अनुसूचित जाती सर्वसाधारण, ब) सर्वसाधारण स्त्री.
● □ प्रभाग रचना अशी : □ क्र.१ – महतीनगर,पोलीस लाईन,इरिगेशन कॉलनी, दत्तनगर. □ प्रभाग क्र.२ – श्रीनाथ सोसायटी,बस स्थानक, इंदापूर महाविद्यालय
□ प्रभाग क्र.३ – सोनाईनगर, भारती टॉवर, जय भवानी मंदिर परिसर, खंडोबा मंदिर परिसर, गणेशनगर, सावतामाळीनगरचा काही भाग. □ प्रभाग क्र.४ – सावतामाळीनगर,काझी गल्ली,नेहरु चौक,मोमीन गल्ली,जौंजाळ वाडा,कासारपट्टा,कुरेशी गल्ली,
□ प्रभाग क्र.५ – अंबिकानगर,नगरपरिषद कार्यालय परिसर,पिसे गल्ली,बाजारतळ,खडकपूरा,मारुती मंदिर परिसर. □ प्रभाग क्र.६ – मंडई परिसर,सातबोळ,माळी गल्ली, तेली गल्ली,पिसे वाडा,शेख मोहल्ला,बटरगल्ली, रामदास पथ. □ प्रभाग क्र. ७ – सिध्देश्वर मंदिर परिसर, ठाकरगल्ली, कांबळे गल्ली, व्यंकटेशनगर (पूर्ण).
□ प्रभाग क्र. ८ – श्री संत रोहिदास मंदिर परिसर, जामदार गल्ली,कुंभार गल्ली,जुने पोस्ट ऑफिस,जुने तहसिल कार्यालय परिसर, राजेवलीनगर, एस.टी. डेपो परिसर, दुधगंगा परिसर, बाब्रस मळा. □ प्रभाग क्र. ९ – सरस्वतीनगर, शाहूनगर, शिवाजीनगर □ प्रभाग क्र. १०- डॉ. आंबेडकरनगर, साठेनगर, बजरंगनगर, आठभाई मळा. प्रभाग रचनेनुसार इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रभागात चाचपणी सुरू केली आहे..