शिरूर : महान्यूज लाईव्ह
रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत कामगारांचे मोबाईल चोरी करणाऱ्या अल्पवयीन आरोपीकडून चोरीचे ४० मोबाईल संच जप्त करण्यात आले आहे.
याबाबत पोलिस निरीक्षक बळवंत मांडगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत अनेक कामगार वास्तव्यास आहेत.अनेक कामगार हे शिफ्ट नुसार काम करत असतात. कामाच्या वेळा प्रत्येकाच्या वेगळ्या असल्याने कामगार हे खोलीचा दरवाजा उघडा ठेवून बऱ्याचदा झोपत असतात.हीच संधी साधून भामटे मोबाईल चोरीचा प्रयत्न करतात. गेल्या काही दिवसांपासून अशा चोऱ्यांचे प्रमाण एमआयडीसी प्रमाणात वाढले असल्याने चोरीचा छडा लावणे गरजेचे होते, त्यानुसार रांजणगाव एमआयडीसी पोलिस प्रयत्न करत होते. दरम्यान तपास करत असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधाराने संशयितास ताब्यात घेतले.या वेळी अधिक तपास केला असता आरोपीने परिसरात अशाच प्रकारे चोऱ्या केल्या असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या प्रकरणी ४० मोबाईल संच जप्त केले आहे. उर्वरित मोबाईल चे IMI शोधून मालकाचा शोध घेऊन गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे.
हा तपास पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे,सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे,पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ,विजय शिंदे,पोलिस हवालदार सुनील नरके,वैभव मोरे,रघुनाथ हलनोर, यांनी केला आहे.