मुंबई : महान्यूज लाईव्ह
लाखो तरुणांना लष्करात जाण्याची संधी देणारी विशेष योजना आज संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी जाहीर केली. अग्निपथ या नावाने ही योजना ओळखली जाणार असून या योजनेव्दारे लष्करात भरती होणाऱ्या तरुणांना ‘ अग्नीवीर ‘ संबोधले जाणार आहे.
या योजनेअंतर्गत तरुणांची लष्करात चार वर्षासाठीच भरती केली जाणार आहे. चार वर्षानंतर तो लष्करातून निवृत्त होणार आहे. या चार वर्षाच्या काळात त्याला उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जाईल, त्या आधारे तो नागरी क्षेत्रात कुठेही सहजपणे नोकरी मिळवू शकेल.
या योजनेचे अनेक फायदे आहेत.
या योजनेमुळे लष्करामध्ये नवयुवकांची संख्या वाढणार असून लष्करातील जवानांचे सरासरी वय कमी होणार आहे. आतापेक्षा खुप मोठ्या संख्येने तरुणांना लष्करी सेवा करण्याची संधी मिळणार आहे. चार वर्षांचे लष्कराचे प्रशिक्षण पुर्ण केलेला तरुण अर्थातच शिस्तबद्ध आणि शारीरिक , मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त असणार आहे. अशा प्रशिक्षित युवकांची मोठी फौज देशातील उद्योगांना उपलब्ध होणार आहे.
सविस्तर माहिती थोड्याच वेळात…..
I like herm