मुंबई : महान्यूज लाईव्ह
क्रिप्टोकरन्सी हे गेल्या काही वर्षांपासून गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले होते. मात्र अलिकडच्या काळात मात्र क्रिप्टोकरन्सीचे मार्केट सतत खाली येताना दिसत आहे. कालचा सोमवार तर या गुंतवणूकदारांसाठी काळा सोमवार ठरला आहे.
काल सोमवारी बिटकॉईन २३००० डॉलरच्याही खाली आले. डिसेंबर २०२० नंतर कधीही बिटकॉईन इतक्या खालच्या पातळीवर आले नव्हते. एका वेळेस तर या डिजिटल करन्सीत १७ टक्क्याहून जास्त घसरण झाली होऊन ते २२,७६४ डॉलरवर आले होते. पण नंतर काही नुकसान भरून काढल्यानंतर ते १५ टक्के घसरणीवर २३३५१ डॉलरवर स्थिर झाले.
केवळ बिटकॉईनच नाही तर इतरही सर्व क्रिप्टोकरन्सी १० टक्क्यापेक्षाही जास्त घसरल्या आहेत.
गुंतवणूकदारांनी क्रिप्टो डंप केले. सेल्सिअस नावाच्या क्रिप्टो कर्ज देणाऱ्या कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी पैसे काढणे थांबवले. या सगळ्या कारणांमुळे क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये घसरण होत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.