महान्यूज करियर अपडेट
आयडीबीआय बँकेने त्यांच्या देशभरातील बँकांमध्ये एक्झिक्युटिव्ह आणि असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून देशभरात 1544 जागांची भरती होणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करावे लागणार असून, या अर्जाची मुदत 17 जून 2022 पर्यंत आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अपंग प्रवर्गातील उमेदवारांना दोनशे रुपये तर उर्वरित सर्व प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपयांचे परीक्षा शुल्क असणार आहे. ही भरती प्रक्रिया ऑनलाइन चाचणी, कागदपत्रांची तपासणी व पूर्व भरती वैद्यकीय चाचणी या तीन टप्प्यात होणार आहे.
यापैकी एक्झिक्यूटिव्ह पदासाठी वयोमर्यादा किमान वीस वर्षे व कमाल 25 वर्ष; तर असिस्टंट मॅनेजर पदासाठी वयोमर्यादा ही किमान 21 वर्ष ते कमाल 28 वर्ष अशी असावी. या दोन्ही पदासाठी उमेदवार किमान पदवीधर असावा अशी अट आहे
या भरती प्रक्रियेतील परीक्षेसाठी महाराष्ट्रामध्ये मुंबई, ठाणे आणि नाशिक तसेच अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, नागपूर, सोलापूर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि गोवा ही परीक्षा केंद्रे असणार आहेत. यातील अधिक व सविस्तर माहितीसाठी http://www.idbibank.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
I want to join this bank