महान्यूज करिअर अपडेट
ज्यांच्यामध्ये धाडस आहे, नवे काही करायची उमेद आहे आणि ज्यांना नेहमी आणि समुद्र यांचा आकर्षण आहे, अशांसाठी ही सुवर्णसंधी! नवल डॉकयार्ड मध्ये 338 जागांची टेक्निशियन अप्रेंटीशीप पदांसाठी परीक्षा होणार आहे. ती मुंबईमध्ये होणार आहे. साधारणतः आयटीआय व तत्सम तांत्रिक परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असेल.
यामध्ये इलेक्ट्रिशियन, एलेक्ट्रोपलेटर, मरीन इंजिन फिटर, फाउंड्री मेन, मेकॅनिक डिझेल, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, पेंटर, मेटल वर्कर, पाईप फिटर, मेकॅनिक मशीन, टूल मेंटेनन्स, टेलर, प्रशितन व वातानुकूलिकरण, वेल्डर, शिप राईट वूड, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, बिल्डींग कन्स्ट्रक्टर, फोर अँड हिट अशा विविध पदांचा समावेश असून यामध्ये जो उमेदवार आठवी, दहावी, आयटीआय अथवा तत्सम विद्यापीठाची परीक्षा उत्तीर्ण झाला असेल, त्याला ही सुवर्णसंधी असेल.
त्याची प्रक्रिया ही लेखी परीक्षा, मुलाखत व बौद्धिक चाचणी द्वारे होणार आहे. त्यातील अधिक व सविस्तर माहितीसाठी http://www.dasapperanticembi.recttindia.in संकेतस्थळाशी संपर्क साधावा. या जागांसाठी उमेदवार हा 1 ऑगस्ट 2001 ते 31 ऑक्टोबर 2008 या दरम्यान जन्मलेला असावा. अनुसूचित जाती, जमाती साठी शासकीय नियमानुसार वयात सवलत राहील. शारीरिक मोजमापामध्ये उंची किमान 150 सेंटीमीटर तर 45 किलोग्रामपेक्षा कमी वजन नसावे.