औरंगबाद : महान्यूज लाईव्ह
वडपोर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून पुढील सात जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना करत असतात. पण एका जन्मातच आपल्या पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या पतींनी काय करायचे. या जन्मातच सोसवत नाही, तर पुढचे सात जन्म हीच बायको वाट्याला आली तर काय याची तर कल्पनाही करवत नाही, इतके बायकांच्या त्रासाने वैतागलेले नवरे या जगात आहेत.
आता या नवऱ्यांनी वेगळीच शक्कल लढवली आहे. त्यांनी पिंपळाला उलट्या १०८ प्रदक्षिणा घातल्या आहेत आणि सात जन्माचे सोडा, पुढचे सात सेंकदही ही बायको मला देऊ नको असे देवाकडे साकडे घातले आहे. पिंपळ हा मुंजा म्हणजे लग्न न झालेला समजला जातो. त्यामुळे त्याला झाललेल्या या प्रदिक्षणांमुळे देव काय ते समजून घेईल अशी त्यांना आशा आहे. आता खरेतर देवाचीच मोठी पंचाईत होणार असे दिसते आहे.
असो. औरंगाबादजवळ वाळूज एक पत्नीपिडीत आश्रम आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून गेलेले पुरुष या आश्रमात येऊन राहिलेले आहेत. त्या आश्रमात ही पिंपळपोर्णिमा साजरी झाली. सगळीकडे महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन हा सहानुभुतीचा असतो. पण प्रत्येक वेळेसच नवरा बायकोमध्ये नवराच दोषी असतो असे नाही. नवऱ्याला छळणाऱ्याही असंख्य बायका असतात. कायद आणि समाजव्यस्था महिलांच्या बाजूने झुकलेली असल्याचा या बायका भरपूर फायदा उठवतात आणि आपल्या नवऱ्याला छळत राहतात.
त्यामुळेच असे पत्नीपिडीत पुरुष आता एकत्र येऊन आपले गाऱ्हाणे मांडत आहेत. खूप खूप पुर्वी स्त्रिया अबला होत्या. त्यांचे सबलीकरण करण्यासाठी वेगवेगळे कायदे बनवले गेले. मात्र हे कायदे बनविताना पुरुषांना संरक्षण देण्यात आले नाही, त्यामुळे आता महिला सबला होऊन पुरुष अ बला झाला आहे असे या पत्नी पिडीत पुरुषांचे म्हणणे आहे.