फलटण : महान्यूज लाईव्ह
फलटण शहर पोलिसांनी ट्रक क्रमांक एम. एच.२५ यु ८२९२ मधून ५२ डांबराचे बॅरल जप्त केलेले आहेत. जप्त केलेले बॅरल प्रत्येकी वीस हजार रुपये किमतीचे असून त्यामध्ये निळ्या रंगाचे ४१ बॅरल, लाल रंगाचे ८ बॅरल, काळ्या रंगाचे २ बॅरल, पांढऱ्या रंगाचा एक बॅरल, असे साधारणतः २०० किलोचे बॅरल आहेत. वर नमूद ५२ डांबराचे बॅरल संदर्भात कोणीही पोलीस स्टेशन अथवा कोर्टात मालकीहक्क दाखवला नाही.
वरील मुद्देमाल कोणाचा असेल, त्यांनी खरेदी पावत्या पोलीस स्टेशन येथे सादर करून आपला माल ताब्यात घ्यावा, असे आवाहन फलटण पोलीस स्टेशन कडून करण्यात आले आहे.