बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी विज्ञान केंद्राच्या आवारात राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन, महाराष्ट्र सरकार आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सायन्स अँन्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटर उभारण्यात आले आहे. या सायन्स पार्कचे उद्घाटन 16 जून रोजी होणार आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली या उद्घाटनासाठी आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत.
ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी आज या संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे तसेच सायन्स पार्कच्या व्यवस्थापक श्रीमती भाटिया उपस्थित होत्या.
राज्यभरात सध्या चर्चिला जात असलेल्या या सायन्स पार्क मध्ये मुलांच्या बौद्धिक कौशल्य व वैज्ञानिक जागृती वाढीसाठी वेगवेगळे प्रकल्प असणार आहेत. या माध्यमातून शालेय देशात पासूनच विद्यार्थी स्वतंत्रपणे जगातील प्रत्येक कुतूहल असणाऱ्या गोष्टीविषयी आपल्या वेगळ्या सिद्धांताची मांडणी करू शकतील. तसेच त्यांच्यात लहानपणीच वैज्ञानिक वृत्ती वाढीस लागेल.
बारामतीतील माळेगाव नजीकच्या शारदानगर कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात हे सायन्स पार्क असून या सायन्स पार्कच्या उद्घाटनाच्या निमित्ताने 15 व 16 जून रोजी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन देखील होणार आहे. या विज्ञान प्रदर्शनामध्ये 36 जिल्ह्यातील 250 विविध वैज्ञानिक प्रकल्प सहभागी होणार आहेत. राज्यभरातील 127 शाळांना देखील या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या तज्ञ व्यक्तींचे फन सायन्स शो, जादूचे प्रयोग, विज्ञान कार्यशाळा, स्टँडअप कॉमेडी अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी मुलांसाठी असेल. त्या कार्यक्रमासाठी राज्यभरातून सहा हजार विद्यार्थी व सहाशे शिक्षक येणार आहेत.
कृषी प्रमुख राजेंद्र पवार यांनी अधिक माहिती देताना सांगितले की कोरोनाच्या काळातही या सायन्स पार्कचे काम सुरू होते. हे काम थांबले नाही. त्यामुळे अल्पावधीत हे सायन्स पार्क राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी आम्ही उपलब्ध करू शकलो आहोत. या सायन्स पार्कमध्ये मुलांना व शाळांना सहजगत्या करता येण्याजोग्या प्रयोग साहित्याचे किटचे वाटप व प्रशिक्षण दिले जाईल.
भविष्यात विद्यार्थ्यांना या केंद्रात उपलब्ध असणाऱ्या फन सायन्स गॅलरी, एग्रीकल्चरल गॅलरी, ३डी थिएटर, इनोव्हेशन हब, व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंतेड रीलिटी अशा स्वरूपाचे तंत्रज्ञान येथे पाहायला मिळेल जपान कोरिया आणि चीन या देशांमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण व्यवस्था आहे त्यामुळे तेथील तरुण संशोधक टेलिकॉम, ऑटोमोबाईल, होम अप्लायन्सेस या क्षेत्रात भरीव प्रगती करत आहेत याचमुळे कोडींग डेटा सायन्स डिजिटल मार्केटिंग डिझाईन थिंकिंग या तंत्रज्ञानाचा शास्त्रशुद्ध प्रशिक्षण या सेंटरमध्ये देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.