मुंबई : महान्यूज लाईव्ह
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांनी अनोखी कार्यशैली देशभरात सगळ्यांच्याच परिचयाची आहे. विकासकामांसाठी त्यांनी उभ्या केलेल्या पैशांचे करोडो करोडोमधले आकडे ऐकून भल्याभल्यांची मती गुंग होऊन जाते. सध्या त्यांनी उज्जैनच्या लोकसभेच्या खासदाराला दिलेल्या चॅलेंजची सगळीकडे चर्चा आहे. त्यांनी चक्क १ किलोला १ हजार रुपये विकासनिधी देण्याचे वचन खासदार अनील फिरोजिया यांना दिले आहे.
हा किलोचा हिशोब उज्जैनच्या खासदारांच्या वजनाचा होता. खासदार फिरोदिया नितीन गडकरींकडे मतदारसंघाच्या विकासासाठी बजेटची मागणी करत होते. तेव्हा गडकरींनी त्यांच्यासमोर एक अट ठेवली. जर खासदारांनी आपले वजन कमी केले तर प्रत्येक घटलेल्या किलोमागे एक हजार कोटीचा विकासनिधी त्यांच्या मतदारसंघासाठी दिला जाईल, असे गडकरींनी त्यांना सांगितले.
मग काय खासदार लागले कामाला. सध्या खासदार सकाळीच घरातील छोट्याशा बागेत करायला सुरुवात करतात. वजन कमी करण्याचा व्यायाम ते बराच वेळ करतात. त्यानंतर सायकलिंग करतात. त्यांनी आपल्या आहारावरही नियंत्रण ठेवले आहे. चार महिन्यांच्या काळात त्यांनी आपले वजन १५ किलोने कमी केले आहे. १२५ किलो वजनावरून ते आता ११० किलोपर्यंत आले आहेत. अजूनही त्यांची कसरत सुरु आहे. याहूनही अधिक फिट होण्यासाठी ते प्रयत्न करत आहे. यासाठी प्रेरणा दिल्याबद्दल ते गडकरींचे आभार मानत आहेत.
लवकरच ते गडकरींकडे आपल्या मतदारसंघासाठी १५ हजार कोटींची मागणी करणार आहेत. या अनोख्या चॅलेंजची चर्चा आता सगळ्या खासदारांमध्ये सुरु आहेत.