महान्यूज करिअर अपडेट
इंडियन बँकिंग पर्सनल सिलेक्शन अर्थात आयबीपीएस या संस्थेमार्फत प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी व तृतीय श्रेणीचे अधिकारी व कार्यालयीन सहाय्यक या पदांच्या भरतीची मोठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. या भरतीमध्ये आठ हजारांहून अधिक जागा भरल्या जाणार आहेत. (Indian Banking Personal Selection (IBPS) has created a huge opportunity for recruitment of First Class, Second Class and Third Class Officers and Office Assistants. More than 8,000 posts will be filled in this recruitment.)
आयबीपीएस दरवर्षी देशभरातील विविध राष्ट्रीयीकृत व खाजगी बँकांसाठी लागणारी मनुष्यबळाची यंत्रणा उभी करून देते. त्यासाठी या संस्थेमार्फत राष्ट्रीय स्तरावर परीक्षा घेतल्या जातात. आता नव्याने आयबीपीएस ने ही जाहिरात केली असून यामध्ये कार्यालयीन सहाय्यकाच्या 4 हजार 483 तर प्रथम श्रेणी अधिकारी वर्गाच्या 2676 एवढ्या जागांची भरती होणार आहे. या खेरीज व्यवस्थापक पदाच्या 765, संगणक तंत्रज्ञानाच्या 57, सीए ऑफिसर पदाच्या 19, विधी अधिकारी पदाच्या 18, मार्केटिंग ऑफिसर च्या 6, एग्रीकल्चर ऑफिसर च्या 12 अशा विविध जागांची भरती आता होणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी विविध पदांकरता विविध शैक्षणिक अर्हता असून यातील वयोमर्यादेची अर्हता देखील किमान 18 वर्षे, किमान 21 वर्ष व कमाल वयोमर्यादा ही काही पदांसाठी 28 वर्ष, काही पदांसाठी 30 वर्ष, काही पदांसाठी 32 तर काही पदांसाठी 40 वर्षाची कमाल वयोमर्यादा आहे.
या पदांची भरती प्रक्रिया ही पूर्व परीक्षा, मुख्य लेखी परीक्षा, कागदपत्र तपासणी, वैद्यकीय चाचणी व मुलाखतीद्वारे होणार आहे. या भरतीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अपंग व माजी सैनिक उमेदवारांकरता 175 रुपये; तर उर्वरित सर्व प्रवर्गाच्या उमेदवारांकरीता 850 रुपये परीक्षा शुल्क आहे.
याकरता 7 जून पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 27 जून 2022 पर्यंत अर्ज करण्याची अखेरची मुदत आहे. या करता अर्ज करण्यासाठी व विविध सविस्तर माहिती, समांतर आरक्षण व शैक्षणिक अर्हता व वयोमर्यादा साठी आयबीपीएसच्या http://www.ibps.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.