दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथील युवक कृषी उद्योजक विशाल वैजनाथ शिराळ यांना नुकताच राज्यस्तरीय कृषी व सामाजिक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात सन २०२२-२०२३ कृषी व कृषी उद्योग पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. पाटस येथील विशाल शिरोळे यांनी कृषी व उद्योग क्षेत्रात विशेष अशी कामगिरी केल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र कृषी व संशोधन परिषदेचे संचालक डॉक्टर हरिहर कौसडीकर यांच्या हस्ते पुरस्कार चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी कृषी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कृषी पदवीधर संघटनेचे अध्यक्ष महेश कडूस, मंगलाताई कडूस तसेच कृषी क्षेत्रातील विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.