बारामती : महान्यूज लाईव्ह
महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दररोज वाढ होते आहे. विकृत पुरुषी मानसिकतेच्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती मुलींवर जबरदस्ती करताना दिसत आहेत. सिद्धेश्वर निंबोडी येथे अशाच एका घटनेचा अजून तपासही पुर्ण झाला नसताना अशीच एक घटना मोरगाव येथे घडली आहे.
तरडोली येथील एका अल्पवयीन मुलीला शाळेतून एक जण जबरदस्तीने जेजुरी येथे घेऊन गेला. तेथील लॉजवर तिच्यावर बलात्कार करून तिचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो काढून घेतल्याची अमानूष घटना काल ११ जून रोजी घडली आहे. प्रदीप बाळासाहेब शिंदे ( रा. तरडोली, ता.बारामती ) असे या घटनेतील गुन्हेगाराचे नाव आहे.
यासंदर्भात पिडीत मुलीच्या कुटुबियांनी फिर्याद दाखल केली असून प्रदिप शिंदेविरोधात पोलिसांनी अपहरण, बलात्कार तसेच बाललैंगिक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
मुली आणि महिलांवरील या वाढत्या अत्याचाराला रोखण्यासाठी आता पोलीस यंत्रणेने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.