पुणे : महान्यूज लाईव्ह
‘ इथे मराठी कमी आणि भैय्येच जास्त ‘ असे चाकण येथील कार्यक्रमात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हणले. आता त्यांच्या या उद्गारावरून माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
खेड तालुक्यातील वाफगाव येथे झालेल्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. वाफगाव येथे होळकर घराण्याचा परंपरागत वाडा आहे. हा वाडा सध्या रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात आहे. तो वाडा राज्य शासनाने ताब्यात घेऊन जतन करावा अशी मागणी होळकर घराण्याच्या वंशजांनी केली होती. यासंदर्भात पाहणी करण्यासाठी शरद पवार येथे आले होते. या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी हे उद्गार काढले.
पुर्वी चार माणसातील दोन माणसे ओळखीची दिसायची. मात्र आता ती परिस्थिती राहिलेली नाही. औद्योगिकरणामुळे मोठ्या संख्येने कामगारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता मराठी लोकांपेक्षा भैय्यांची संख्या अधिक दिसते, असे शरद पवार म्हणाले.
अर्थातच औद्योगिकरणामुळे या परिसराचा चेहरामोहरा बदलला आहे. येथे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचेही त्यांनी म्हणले आहे.
याच कार्यक्रमात त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. परिसरात पुर्वी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बटाट्याच्या शेतीचाही उल्लेख करून आता ही शेती राहिली आहे का, याबाबतही विचारणा केली. शेतीच्या पाणीपुरवठ्याबाबत ग्रामस्थांना उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबतही त्यांनी उत्तरे दिली.